मोदी सरकारचं मोठं यश, पकडला ७१९४१०००००००० इतका काळापैसा

पंतप्रधान बनल्यानंतरच नरेंद्र मोदी सरकारने काळा पैसा विरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, गेल्या 3 वर्षात 71 हजार 941 कोटींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे.

Updated: Jul 23, 2017, 01:50 PM IST
मोदी सरकारचं मोठं यश, पकडला ७१९४१०००००००० इतका काळापैसा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान बनल्यानंतरच नरेंद्र मोदी सरकारने काळा पैसा विरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, गेल्या 3 वर्षात 71 हजार 941 कोटींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पैशांमध्ये आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा मोठा वाटा आहे. अर्थ मंत्रालयाने न्यायालयाला सांगितलं की 9 नोव्हेंबर ते 10 जानेवारीपर्यंत नोटबंदी दरम्यान 5400 कोटींची संपत्ती जप्त केली ज्यामध्ये 303.367 किलो सोनं आहे.

सरकारने 1 एप्रिल, 2014 ते 28 फेब्रुवारी, 2017 पर्यंतच्या अघोषित संपत्तीची माहिती दिली ज्यामध्ये नोटबंदीचा काळही समाविष्ट आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे, "तीन वर्षात आयटी विभागाने 2,027 ग्रुप्सवर छापे टाकले. ज्यामध्ये 36,051 कोटी रुपये सापडले, त्याशिवाय 2890 कोटींची मालमत्ता देखील जप्त केली."

3 वर्षांत 15000 कारवाया

आयकर विभागाने 1 एप्रिल, 2014 ते 28 फेब्रुवारी, 2017 पर्यंत 15 हजार कारवाया केल्या. ज्यामध्ये 33 हजार कोटींची अघोषित संपत्ती सापडली. सरकारने नोटबंदीचं यश सांगतांना म्हटलं की, 9 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या नोटबंदीच्या 2 महिन्यांच्या काळात आयकर विभागाने कठोर पावले उचलली.
नोटबंदी दरम्यान आयकर विभागाने 1100 सर्च ऑपरेशन केले आणि 5100 वेरिफिकेशन केले. या कारवाई दरम्यान 610 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये 513 कोटींच्या रोख रक्कम देखील आहे.