Job News : तुम्हाला settled करणारी सरकारी नोकरीची बातमी; 'मास्टर्स' झालंय? लगेच क्लिक करा

नोकरीची ही खास  बातमी आहे तुमच्यासाठी

Updated: Jul 27, 2022, 11:19 AM IST
Job News : तुम्हाला settled करणारी सरकारी नोकरीची बातमी; 'मास्टर्स' झालंय? लगेच क्लिक करा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

Job News : खासगी क्षेत्रात कितीही दणकट पगाराची नोकरी असली, तरीसुद्धा सरकारी नोकरीप्रती असणारी आस काही केल्या कमी होत नाही. तुमच्याआमच्यापैकी अनेकांनी एकदातरी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला असेल. किंवा काहीजण अद्यापही अशा नोकरीच्या प्रतिक्षेत असतील. या सर्वच मंडळींसाठी आता शासनदरबारी विविध विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी समोर आली आहे. (government job recruitment language translator)

तुमचं हिंदी विषयातील मार्स्टर्स झालं असेल आणि ट्रान्सलेटरच्या नोकरीसाठी इच्छुक असाल, तर नोकरीची ही खास  बातमी आहे तुमच्यासाठी. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयात, सरकारी विभागात, गव्हर्नमेंट ऑरगनायझेशनमध्ये, ग्रुप बीच्या नॉन गॅझेटेड स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ज्युनियर , सिनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर या पदांसाठी रिक्रुटमेंट सुरु झाली आहे. 

इंग्रजी या विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शिक्षण, हिंदी इंग्रजी अनुवादाचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स आणि २- ३ वर्षांचा अनुभव अशी या नोकरीची पात्रता आहे. 

नोकरीसाठी अर्जदाराचं वय 30 वर्षांहून अधिक नसावं 4 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करताना 100 रु फी भरणेही आवश्यक आहे.  सदर नोकरीसंदर्भातील अधिक माहितीसाठी ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. स्टाफ सिलेक्शन  कमिशन कडून जाहिरात आली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x