'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा

देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 08:24 PM IST
'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौभाग्य योजना म्हणजेच सहज बिजली योजनेचे उद्घाटन केले. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

नवभारतातील प्रत्येक घरात केवळ वीजच पोहोचणार नाही तर वीजकनेक्शनही असेल.

आता आपण वीज संकटापासून वीज निर्मितीकडे निघालो आहोत असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.

थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लाऊन सव्वाशे वर्षे लोटली तरी भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा उजेड नव्हे तर मेणबत्ती, कंदीलाचा उजेडच दिसतो अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

काय होणार फायदे ?

सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार
गरीबांना सरकारी कार्यालयांत खेटे घालावे लागणार नाहीत
कोणत्याही गरीबाला यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही.
योजनेत नाव नसलेल्यांना ५०० रुपये भरून फायदा घेता येणार 

किती येणार खर्च ?

यासाठी सरकारला १६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.