पीपीएफसह या बचत योजनांबाबत होणार मोठा निर्णय

पीपीएफसह छोट्या बचत योजनेच्या गुंतवणूकदारांना लवकरच दिलासा मिळू शकतो.

Updated: Feb 12, 2018, 11:03 PM IST
पीपीएफसह या बचत योजनांबाबत होणार मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : पीपीएफसह छोट्या बचत योजनेच्या गुंतवणूकदारांना लवकरच दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार याबाबत नवा नियम करण्याच्या तयारीमध्ये आहे. गुंतवणूकदारांना वेळेआधी पैसे काढता किंवा अकाऊंट बंद करता येऊ शकतं.

पैशांची अचानक गरज पडली तर गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल, असं सरकारला वाटतंय. तसंच या निर्णयामुळे बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास सरकारला आहे. छोट्या बचत योजनांसाठीचे नियम एकसारखेच तसंच सोपे असतील.

सध्या अल्पवयीनांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यासाठी ठराविक स्कीम्स आहेत. पण आता सरकार याला सगळ्या स्कीममध्ये आणण्यासाठी तयार आहे. तसंच अल्पवयीनाला त्याचा उत्तराधिकारी ठरवण्याचाही अधिकार मिळू शकतो.

सध्या वेगवेगळ्या स्कीमसाठी वेगवेगळे कायदे आहेत. १५ वर्षांच्या पीपीएफ स्कीममध्ये सातव्या वर्षी पैसे काढता येऊ शकतात. यामध्ये ४ वर्षानंतर ५० टक्के हिस्सा काढता येतो. काही वेळा ५ वर्षानंतरही अकाऊंट बंद करता येतं. पण यासाठी सरकार टीडीएस कापतं. तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये वेळेआधी पैसे काढण्याच्या अटी कठीण आहेत.