ट्विन टॉवरच्या जागी उभं राहणार भव्य मंदिर, बैठकीनंतर मोठा निर्णय

नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करतण्यात आला आहे

Updated: Sep 1, 2022, 10:23 PM IST
 ट्विन टॉवरच्या जागी उभं राहणार भव्य मंदिर, बैठकीनंतर मोठा निर्णय title=

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh)  नोएडा (Noida) येथे बांधण्यात आलेला ट्विन टॉवर (twin towers) जमीनदोस्त झाला आहे. त्यानंतर तेथे काय बांधणार यासाठी आरडब्ल्यूएची गुरुवारी बैठक झाली. त्याठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. जिथे रामलल्ला आणि भोलेनाथ यांच्यासोबत इतर देवांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत. यासोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी मोठे उद्यान तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे.

यावर निर्णय घेण्यासाठी आरडब्ल्यूएने बैठक घेत सोसायटीतील सर्व रहिवाशांची ही इच्छा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वात मोठी बाब म्हणजे सुपरटेकचा एमराल्ड टॉवर अद्याप सोसायटीच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. त्याची मालकी अद्याप बिल्डरकडे आहे. बिल्डरने तेथे कोणतेही बांधकाम केल्यास त्याला दोन तृतीयांश रहिवाशांची संमती घ्यावी लागेल.

आरडब्ल्यूएच्या लोकांचे म्हणणे आहे की रहिवाशी पूर्णपणे आरडब्ल्यूएच्या पाठीशी आहेत आणि पुन्हा कायदेशीर लढाई लढावी लागली तर ते तयार आहेत.

 उद्यान व भव्य मंदिराचे नियोजन सोसायटीने अगोदरच केले असून, उद्यान उभारण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यात जास्तीत जास्त हिरवळ असावी जेणेकरून लहान मुलांबरोबरच वृद्धांनाही बसायला व चालायला जागा मिळेल.

ट्विन टॉवरचे डेब्रिज सेक्टर 80 येथील सीआयडी वेस्ट प्लांटमध्ये टाकण्यात येणार आहे. सेक्टर-80 सी अँड डी वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये जाईल. हा प्लांट रॅमकी कंपनी चालवत आहे. नोएडामध्ये दररोज सुमारे 250 ते 300 मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. आता या प्लांटमध्ये ट्विन टॉवरच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी या प्लांटवर दोन शिफ्टमध्ये काम केले जाणार आहे. प्राधिकरणाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर.के. शर्मा यांनी सांगितले की, प्लांटची क्षमता 850 टन आहे, परंतु नोएडामध्ये, डेब्रिजची विल्हेवाट लावली जाते. आता दोन शिफ्टमध्ये काम होणार असून, त्यासाठी मनुष्यबळ वाढवता येईल. या ढिगाऱ्यापासून फरशा, क्लिंकर, विटा आणि इतर उत्पादने तयार केली जातील.

ट्विन टॉवर साइटवरून दररोज 250 मेट्रिक टन डेब्रिज डंपरद्वारे साइटवर नेले जाईल. यासाठी 20 डंपर लावण्यात आले आहेत. प्रत्येक डंपरची क्षमता 10 ते 12 मेट्रिक टन आहे. एनजीटीच्या नियमांचे पालन करून, धूळ उडू नये म्हणून त्यावर ग्रीस शीट आणि पाणी टाकून या डेब्रिजची वाहतूक केली जाईल.

ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर बाहेर आलेला ढिगारा सुमारे 80 हजार मेट्रिक टन असल्याचा अंदाज आहे. यामध्ये 52 हजार मेट्रिक टन डेब्रिज तळघर आणि परिसरात भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 28 हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.