VIDEO : भर मंडपात नवरदेवाचा अजब कारनामा....

लग्नविधी सुरू असताना घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक 

Updated: Jul 4, 2021, 07:23 AM IST
VIDEO : भर मंडपात नवरदेवाचा अजब कारनामा.... title=

मुंबई : अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओंची जोरदार चर्चा रंगते. असाच एक लग्न मंडपातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं आहे. (Groom touching feet of his Bride video went viral on social media) नवरदेवाच्या या कारनाम्याला पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु असताना लोकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये लग्नविधी पडत असताना नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. तसेच नवरदेवाला त्याचे पाय धरून नवरीने प्रणाम केला आहे. त्यानंतर नवरदेवसुद्धा वरमाला घालण्यासाठी नवरीच्या पुढे आला आहे. त्याने आधी नवरीच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी नवरदेवानेही नवरीचे पाय धरले आहे. पाय धरुन नवरदेवाने नवरीला प्रणाम केला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. भर मंडपात या नवरदेवाने नवरीचे पाय धरल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. काही लोकांनी नवरदेवाच्या या कृतीला विरोध केला आहे. तर काही लोकांनी नवरीचे पाय धरण्यात काहीही गैर नाही असे म्हणत नरदेवाच्या या कृतीचे समर्थन केले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत