झोपेतच मृत्यूने गाठले, १६ हजार जणांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचा हार्ट अटॅकने मृत्यू

Gujarat cardiologist Gaurav Gandhi: १६ हजार जणांना जीवदान दिले मात्र स्वतःलाच वाचवू शकले नाही. हृदयरोगतज्ज्ञांचा हृदयविकाराने मृत्यू

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2023, 04:59 PM IST
झोपेतच मृत्यूने गाठले, १६ हजार जणांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचा हार्ट अटॅकने मृत्यू title=
Known Gujarat cardiologist Gaurav Gandhi dies of heart failure at 41

Gujarat cardiologist Gaurav Gandhi Died: गुजरातचे (Gujrat) प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर गौरव गांधी (Dr Gaurav Gandhi Cardiologist) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. गौरव गांधी यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी गौरव गांधी यांचे हार्ट अॅटेकने निधन झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. गौरव गांधी यांनी आत्तापर्यंत १६ हजार ऑपरेशन करुन हजारो जणांना जीवदान दिलं आहे. (Dr Gaurav Gandhi Cardiologist Gujarat Died Of Heart Attack)

डॉ. गौरव गांधी हे सोमवारी नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री रुग्णालयात रुग्णांचे चेकअप केले होते. त्यानंतर ते घरी गेले होते. घरी गेल्यावरही त्यांचे रोजचे रुटिन सुरू होते. रात्री जेवून झाल्यावर ते थोडावेळ्याने झोपायला गेले होते. तोपर्यंत ते अगदी ठणठणीत दिसत होते. झोपायला जाण्याआधी रात्री कुटुंबीयांसोबत त्यांनी गप्पाही मारल्या होत्या. 

मंगळवारी सकाळी सहा वाजता कुटुंबीयांनी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी हाका मारल्या मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हार्ट अॅटेकमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. कार्डियोलॉजिस्ट सर्जन म्हणून ते प्रसिद्ध होते. अवघ्या वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. 

डॉ. गौरव गांधी यांनी त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय कारकीर्दीत १६ हजाराहून अधिक जाणांची हार्ट सर्जरी केली होती. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून वैद्यकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

डॉ. गांधी यांच्या मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गांधी हे नेहमी लोकांना ताण न घेण्याचा सल्ला देत होते. असा सल्ला देणाऱ्या माणसाला हार्ट अॅटेक कसा येऊ शकतो, असा सवाल ते उपस्थित करत आहेत. 

दरम्यान, हसत खेळत असताना किंवा खेळताना अचानक हार्ट अॅटेक आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तरुण वयातील मुलांनी हार्ट अॅटेकमुळं जीव गमावल्याची घटना हल्ली सर्रास घडत असतात. सोशल मीडियावर गेल्या दोन वर्षांपासून असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. भारतीयांची जीवनशैली ही हार्ट अॅटेकला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हार्ट अॅटेकची लक्षणे ही सौम्य असतात त्यामुळं त्यांना सायलेंट किलर असंही म्हणतात.