गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

Updated: Dec 18, 2017, 09:26 AM IST
गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

सेन्सेक्स ६००.५१ अंकांनी घसरुन ३२,८६२.४६ अंकावर पोहोचलाय. तर निफ्टीतही घसरण होत तो १०,१३४. ३५ अंकावर पोहोचलाय.

सुरुवातीला काँग्रेस गुजरातमध्ये पिछाडीवर होते. मात्र आता हाती येत असलेल्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत आघाडी घेतलीये.