'मीरा' होऊन 'कृष्णा'ची सेवा करण्यासाठी IPS Bharti Arora यांनी घेतला VRS

23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा वेधलेलं लक्ष   

Updated: Jul 29, 2021, 09:27 AM IST
'मीरा' होऊन 'कृष्णा'ची सेवा करण्यासाठी IPS Bharti Arora यांनी घेतला VRS title=
संग्रहित छायाचित्र

चंदीगड : हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी (IPS Officer Bharti Arora)  भारती अरोरा यांनी कृष्णावरील भक्तीपोटी नोकरीतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णभक्तीपोटी त्यांनी (Voluntary Retirement) स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे. 

सध्याच्या घडीला भारती अरोरा अंबाला येथे आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पण, आपलं उर्वरित आयुष्य कृष्णसेवेत व्यतीत करण्यासाठी म्हणून त्यांनी कर्तव्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस खात्यात नोकरीला असताना 23 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा धाडसी कर्तृत्त्वानं साऱ्यांच्याच नजरा वळवल्या होत्या. 

Doodhsagar Waterfall मुळं थांबवली Train, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक् 

 

मुख्य सचिवांना लिहिलं पत्र 
‘डेली पायनियर’च्या वृत्तानुसार आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहित स्वेच्छा निवृत्तीची मागणी केली आहे. 'मी आयुष्याच्या 50 व्या वर्षी स्वइच्छेनं अखिल भारतीय सेवा (DCRB) नियम 1958 मधील नियम 16(2) अंतर्गत 1 ऑगस्ट 2021 पासून सेवानिवृत्त होण्यासाठी हा अर्ज करत आहे', असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिल्याचं कळत आहे. 

1998 Batch मधील IPS आहेत अरोरा 
आपण आता जीवनातील अंतिम लक्ष्य गाठू इच्छितो अशीच भावना भारती अरोरा यांनी व्यक्त केली आहे. गुरु नानक देव, चैतन्य महाप्रभू, कबीरदास, तुलसीदास, सूरदास, मीराबाई, सूफी या सर्व संतांच्या मार्गावर जाण्यासाठी आणि कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी त्या या निर्णय़ावर पोहोचल्या आहेत. 

'या' कारणांमुळे गाजलं आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांचं नाव 
आयपीएस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना भारती अरोरा यांनी 2007 समझौता एक्स्रप्रेस रेल्वे स्फोट प्रकरण (Samjhauta Express Train Blast Case) हाताळलं होतं. त्यावेळी त्या तत्तालीन (रेल्वे) पोलीस अधिक्षकपदी कार्यरत होत्या. अंबाला येथे सेवेत असताना त्यांनी 2009 मध्ये तत्कालीन भाजप नेता अनिल विज यांना अटक करत सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. याशिवाय 2015 मध्ये वरिष्ठ सहकारी नवदीप सिंह विर्क यांच्यासोबतच्या वादामुळंही त्या प्रकाशझोतात होत्या. विर्क यांच्यावर त्यांनी बलात्कार प्रकरणाच्या तपासात अडचणी आणण्याचा आणि आपल्याला धमकावल्याचा आरोप केला होता.