Haryana Vidhan Sabha Chunav Exit Poll: हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. येत्या आठ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आम आदमी पार्टी, इनेलो-बसपा आणि जेजेपी-आझाद समाज पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासहित 1027 उमेदवारांचं नशीब ईव्हीएममध्ये बंद झालंय. मतमोजणी येत्या मंगळवारी म्हणजे 8 ऑक्टोबरला होणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात यावर एक नजर टाकूया.
हरियाणासाठी ध्रुव रिचर्सचा एक्झिट पोल
ध्रुव रिचर्स या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार हरियाणातील 90 विधानसभा जागांपैकी काँग्रेसला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला 27 जागांवर समाधान मानालं लागेल. इतर पक्षांना 6 जागा मिळण्याच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Dhruv Research Survey
Total - 90
Congress - 57
BJP- 27
Others- 6
मॅट्रिजचा एक्झिट पोल
मॅट्रिजच्या सर्व्हेनुसारही काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हरियाणाता काँग्रेसला 55-62 तर भाजपला 18-24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Matriz Survey
Total: 90
Congress: 55-62
BJP: 18-24
Others: 2-8
न्यूज-18 एक्झिट पोल
न्यूज -18 च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 59 तर भाजपला 21 आणि इतर पक्षांना 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News18 Survey
Total: 90
Congress: 59
BJP: 21
Others: 10
दैनिक भास्करचा एक्झिट पोल
दैनिक भास्करने दिलेल्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 90 पैकी 44-54 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भाजपला 19-29 आणि इतर पक्षांना 4-9 जागा मिळण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे.
Dainik Bhaskar Survey
Total: 90
Congress: 59
BJP: 21
Others: 10
पीपल्स पल्सचा एक्झिट पोल
People Pulse Survey
Total: 90
Congress: 55
BJP: 26
INLD: 2-3
Others: 4-6
P-Marq चा सर्व्हे
P-Marq Survey
Total: 90
Congress: 51-61
BJP: 27-35
INLD: 2-3
जिस्टच्या सर्व्हेतही काँग्रेसला बहुमत
Jist Survey
Total: 90
Congress: 45-53
BJP: 29-37
INLD+: 0-2
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.