RBI नं निराशा केल्यानंतर HDFC चा ग्राहकांना धक्का; EMI 'इतक्या' टक्क्यांनी वाढला

HDFC Home Loan EMI: पगारातील बराच भाग इएमआय अर्थात कर्जाचा हफ्ता भरून संपतो अशी तक्रार करणाऱ्यांची चिंता आता आणखी वाढणार आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 9, 2024, 02:57 PM IST
RBI नं निराशा केल्यानंतर HDFC चा ग्राहकांना धक्का; EMI 'इतक्या' टक्क्यांनी वाढला
hdfc bank home loan car loan personal loan interest rate hike latest update

HDFC Home Loan EMI: नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीमध्ये आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट स्थिर ठेवत बँक ग्राहकांची निराशा करण्यात आली. ज्यानंतर आता देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेनंही खातेधारकांना दणका दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

HDFC बँकेनं काही काळासाठी कर्जावर असणाऱ्या MCLR दरात वाढ केली असून, ही वाढ 0.05 टक्क्यांनी करण्यात आली आहे. बँकेच्या या एका निर्णयामुळं ओवरनाईट पिरियडसाठी कर्जाची आकडेवारी 9.15 टक्क्यांवरून थेट 9.20 टक्क्यांवर पोहोचली आहे. उपलब्ध माहितीनुसार 7 डिसेंबरपासून हे नवे व्याजदर लागू झाले आहेत. 

बँकेच्या या निर्णयाचा सामान्यांवर कसा परिणाम? 

HDFC च्या या निर्णयानंतर सर्वसामान्य खातेधारकांवर थेट परिणाम होताना दिसणार असून, गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Car Loan) आणि खासगी कर्ज अर्थात पर्सनल लोनच्या इएमआय हफ्त्यामध्ये वाढ होणार आहे. एमसीएलआर वाढल्यामुळं फ्लोटिंग लोनचे व्याजदर वाढत असून, त्यामुळं ग्राहकांना वाढीव ईएमआयचा फटका बसणार आहे. दरम्यान, इतर पिरियड लोन मात्र बँकेनं स्थिर ठेवले आहेत. येत्या काळात बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात असणाऱ्यांनाही जास्त दरानं कर्ज घ्यावं लागणार आहे ही या निर्णयानंतरची वस्तूस्थिती. 

हेसुद्धा वाचा : Indian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा 

कर्जदारांना दणका देण्याआधी बँकेनं PayZappवॉलेट यूजर्सचीही निराशा केली होती. 6 डिसेंबर रोजी बँकेनं एक नोटिफिकेशन जारी करत PayZappवॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड (Credit Card) नं पैसे भरल्यास 2.5 टक्के GST देणं बंधनकारक असेल असं जाहीर केलं. या वॉलेटमध्ये डेबिट कार्डनं पैसे भरण्यावर मात्र कोणताही कर आकारला जाणार नाही. PayZapp हे एचडीएफसीचच एक मोबाईल वॉलेट अॅप असून, या अॅपच्या मदतीनं ऑनलाईन शॉपिंगपासून फ्लाईट बुकिंग, युटिलिटी बिल, मोबाईल रिचार्ज अशी कामं करता येतात. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More