इथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स

पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 11:43 PM IST
इथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स title=

मुंबई : कर नियोजन हे काही सोपे काम नाही. आपण कायदेशीररित्या करुन गुंतवणूक करू शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यामूळे हीच रक्कम जर आपल्या भविष्यासाठी उपयोगी येत असेल तर सर्वांनाच आवडेल. त्यामूळे आपण पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ):

नोकरदार वर्गासाठी भविष्य निधीते भरपूर महत्व आहे. भविष्यासाठी किंवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारे हे पैसे आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक कपात करून भविष्य निधी अकाऊंटमध्ये जमा झालेला हा पैसा आहे.
व्याज दर आणि कर लाभ:

ईपीएफवरील व्याज दर प्रत्येक वर्षी गुंतवणूकदार १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. या व्याजावरदेखील कर सवलत आहे.

भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) :  

आकर्षक व्याज दर आणि रिटर्नसह सिक्यूरीटी मिळते. ही योजना बँक आणि पोस्ट ऑफिस द्वारे चालविली जाते. साधारणपणे १५ वर्षांच्या परिपक्वतेनंतरच पीपीएफचे पैसे काढले जाऊ शकतात. अशा खात्यात आपण कमीतकमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख जमा करू शकता.

व्याज दर आणि कर लाभ:

पीपीएफवरील व्याजदर आणि इतर छोटी बचत योजना प्रत्येक तिमाहीत रीसेट केली जातात. पीपीएफचे गुंतवणूकदार आता ७.८ टक्के व्याज घेत आहेत. पीपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर तुम्हाला ८० सी अंतर्गत कर सवलत मिळते. पीपीएफ अकाउंटवर मिळणा-या व्याजांवर तुम्हाला कोणतेही कर भरावे लागणार नाही.

मुदत ठेव :

बँक मुदत ठेव सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणुकदारांना ठराविक कालावधीनंतर रिटर्न्स मिळतात आणि बाजारातील अस्थिरतेवर याचा परिणाम होत नाही.
 
व्याज दर आणि कर लाभ:

एफडी दरांवर व्याजदर सर्व बँकांनुसार बदलतो. उदाहरणार्थ, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १ जुलै २०१७ पासून रिटेल नॅशनल टर्म सुरू केली आहे. आता ६.९% पूर्वी एसबीआय एका वर्षाच्या मुदत ठेवीवर ६.७५% भरत आहे. पण सामान्य एफडी साठी होते, जी करसवलत लाभ देत नाहीत. 

नॅशनल पेंशन स्कीम:

१ जानेवारी २००४ पासून नॅशनल पेंशन सिस्टिम (एनपीएस) सुरू करण्यात आली. एनपीएस चे उद्दीष्ट पेन्शन सुधारणा करणे आणि नागरिकांमध्ये निवृत्तीसाठी बचत करण्याची सवय लावणे आहे. एनपीएस फर्स्ट क्लास अकाउंट सक्रिय ठेवण्यासाठी अनिवार्य रक्कम ६,००० कमी करुन १००० इतकी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: 

ही बचत योजना भारत सरकारकडून केली जाते आणि सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आहे.  या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम कलम ८० सी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. एनएससीमध्ये आपण निश्चिंत होऊन पैसे कमवू शकता. कारण हे बँका मुदत ठेव पेक्षा जास्त सुरक्षित असतात.
व्याज दर आणि कर लाभ: 

एनएससीमध्ये व्याज मुदतपूर्तीच मिळते. एनएससीवरील व्याज ८ टक्के वार्षिक दराने मिळते. ज्यामुळे वार्षिक८.१६ टक्के रिटर्न्स मिळतो. म्हणून ६ वर्ष १०० रुपये गुंतविल्यास १६०१ रुपये मिळतात.एनएससीमध्ये कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही आणि व्याज रकमेवर टीडीएस कापला जात नाही. तथापि, एनएससीवरील कर हा करपात्र आहे.