सरकारी नोकरी! 'या' पदांसाठी असेल इतकी वेतन मर्यादा

इच्छुक उमेदवाराचं शिक्षण...

Updated: Jul 9, 2020, 03:25 PM IST
सरकारी नोकरी! 'या' पदांसाठी असेल इतकी वेतन मर्यादा
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Sarkari Naukri - India Seeds कडून प्रशिक्षणार्थी पदासाठीच्या नोकरीच्या रिक्त जागांवरील भरतीसाठीची अर्ज मागवण्यात आले आहेत. India Seeds कडून Management Trainee, Senior Trainee, Trainee आणि Trainee Mate या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं कळत आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराचं शिक्षण १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, बीएससी, बी टेक, एमबीए उत्तीर्ण यापैकी असावं. ३० जुलै २०२०पूर्वी या पदांसाठी अर्ज भरण्याची वेळमर्यादा देण्यात आली आहे. 

वेतन मर्यादा 

मॅनेजमेंट ट्रेनी- ४३५२० रुपये (प्रतिमहा)
सिनियर ट्रेनी - २३९३६ रुपये (प्रतिमहा)
डिप्लोमा ट्रेनी - १८४९६ रुपये (प्रतिमहा) 
ट्रेनी मेट - १७९५२ रुपये (प्रतिमहा) 
असिस्टंट (कायदेशीर) - २२००० (प्रतिमहा) 

रिक्त जागा 

मॅनेजमेंट ट्रेनी- ३६
सिनियर ट्रेनी - ५९
डिप्लोमा ट्रेनी - ०७
ट्रेनी - ११२
ट्रेनी मेट - ०३
असिस्टंट (कायदेशीर) - ०३

शैक्षणिक पात्रता 

मॅनेजमेंट ट्रेनी- बीएससी (कृषी), एमबीए / एमएससी/ बीई/ बीटेक (कृषी. अभियांत्रिकी), सिव्हील/  सीए/ सीएस

सिनियर ट्रेनी - एमबीए (कृषी, व्यवसाय व्यवस्थापन), बीएससी (कृषी)/ किंवा सिव्हिल/ कृषी/ इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा 

डिप्लोमा ट्रेनी - फिटर म्हणून आयटीआयचं प्रमाणपत्र किंवा बीबीए/ बीसीए/ बीए (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा बीकॉम, बीएससी (कृषी)/ केमिस्ट्री/ बॉटनी 

ट्रेनी मेट - बारावी उत्तीर्ण (कृषी) 

असिस्टंट (कायदेशीर) - कायद्याच्या शिक्षणाची पदवी 

 

वयोमर्यादा 

Management Trainee, Senior Trainee/ Diploma Trainee, Trainee या पदांसाठी २७ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. तर, ट्रेनी मेट या पदासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. असिस्टंट (कायदेशीर) या पदासाठी ३० वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. 

अर्जासाठीचं शुल्क 

विनाआरक्षित वर्ग, EWS/OBC/Ex-S यांच्यासाठी अर्जाचं शुल्क ५२५ रुपये इतकं आहे. तर, SC/ST/PWD यांच्यासाठी हे शुल्क २५ रुपये इतकं आहे. फी ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर पदांसाठीची निवड प्रक्रिया Computer Based Test (CBT) म्हणजेच संगणकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. 

इच्छुक उमेदवारांनी खालील संकेतस्थळांवर अर्ज दाखल करावेत

http://indiaseeds.com