Railway Stations Name On Yellow Board: रेल्वे स्थानकांची नावं पिवळ्या रंगाच्या बोर्डावरच का लिहिलेली असतात?

Why Railway Stations Name Are Written On Yellow Board: तुम्ही अनेकदा रेल्वे स्थानकांवर पिवळ्या रंगांच्या बोर्डवर काळ्या रंगात लिहिलेलं नाव अशा फॉरमॅटमधील बोर्ड पाहिला असेल. पण स्टेशनचं नाव लिहिण्यासाठी पिवळा बोर्डच का वापरला जातो?

Updated: Feb 14, 2023, 05:39 PM IST
Railway Stations Name On Yellow Board: रेल्वे स्थानकांची नावं पिवळ्या रंगाच्या बोर्डावरच का लिहिलेली असतात? title=
why railway stations name are written on yellow board

Why railway stations name are written on yellow board with black letters: भारतात ट्रेनने  (Indian Railway) प्रवास करताना तुम्ही अनेकदा रेल्वे स्थानकांच्या नावाचे फलक पिवळ्या रंगांचे असल्याचं पाहिलं असेल. पिवळ्या रंगाच्या फलकावर काळ्या रंगाने लिहिलेला मजकूर (railway stations name board) अशाच फॉरमॅटमध्ये आपल्याला भारतभरामध्ये स्टेशन्सची नावं पहायला मिळतात. भारतातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर स्थानकाचं नाव लिहिण्यासाठी इतर रंगांचं कॉम्बिनेशन वापरलं जात नाही. पण हाच रंग रेल्वेकडून का वापरला जातो यामागेही एक खास कारण आहे. याच रंगांमध्ये स्टेशनची नावं लिहिण्याची काही खास परंपरा भारतीय रेल्वेमध्ये आहे का? मागील अनेक दशकांपासून ही परंपरा पाळली जात आहे का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याचं उत्तर हो असं आहे. तसेच या रंगाच्या वापरामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यामागे काय वैज्ञानिक कारण असेल. चला तर जाणून घेऊयात या पिवळ्या आणि काळ्या रंगांच्या जोडीमागचं खरं कारण...

लाल रंग सिग्नलला वापरतात कारण...

खरं तर पिवळ्या रंगाची वेवलेंथ ही 7 प्रमुख रंगाच्या वेवलेंथचा विचार केल्यास तिसऱ्या स्थानी आहे. ज्या रंगाची वेवलेंथ जेवढी लांब असते तेवढ्या दूरुन तो रंग दिसू शकतो असं साधं गणित आहे. सर्वात लांब वेवलेंथ लाल रंगाची आहे. लाल रंग दूरुन स्पष्टपणे दिसण्याचं कारण म्हणजे हा रंग त्याच्या वेवलेंथमुळे पसरत नाही म्हणजेच अंधूक दिसत नाही. त्यामुळेच ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्यासाठी किंवा धोक्याचा इशारा देण्यासाठी लाल रंगाचा वापर केल जातो. मात्र याच कारणामुळे लाल रंगाचा फलक मजकूर लिहिण्यासाठी वापरला जात नाही. कारण त्यामुळे मजकुरापेक्षा फलक अधिक ठळक दिसेल.

मग स्टेशनच्या नावासाठी पिवळा रंग का?

आता लाल रंग लांबूनही दिसू शकतो तर त्याच रंगाचा फलक करुन मोठ्या आकारात मजकूर लिहिल्यास काय अडचण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागील कारण आहे पिवळा रंग हा लाल रंगापेक्षा एका गोष्टीमध्ये सरस आहे. पिवळ्या रंगाची लॅटरल पॅराफेरिएल व्हिजन ही लाल रंगाच्या तुलनेत 1.24 टक्के अधिक आहे. म्हणजेच पिवळा रंग हा थेट तुमच्या डोळ्यासमोर नसला आणि डोळ्यांच्या एका बाजूला असला तर तो लाल रंगाच्या आधी तुम्हाला दिसेल. तसेच पिवळा रंग हा अंधारामध्ये लाल रंगापेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतो. धूकं असतानाही पिवळा रंग हा लाल रंगापेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतो. कारण धूकं किंवा अंधारामध्ये लाल रंग हा पिवळ्या रंगापेक्षा अधिक पसरतो किंवा अंधुक दिसतो.

मजकूर लिहिण्यासाठी काळा रंग का?

असं यामुळे कारण कलर कॉन्ट्रास्टमुळे काळा रंग पिवळ्या रंगापेक्षा जास्त उठून दिसतो आणि फार लांबून नजरेस पडतो. या बोर्डावर लिहिलेला मजकूर वाचणं सहज शक्य होतं आणि हा मजकूर वाचताना अडचण येत नाही. गाडी चालवणाऱ्या लोको पायलेटला दूरुनच हा बोर्ड आणि त्यावर लिहिलेला मजकूर दिसतो. त्यामुळे लोको पायलेट त्या हिशोबाने ट्रेनच्या गतीवर नियंत्रण ठेवतो.