Holi Color Hamful for Skin : होळीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. देशभरात होळी साजरी करण्यात येत आहे. रंगांनी उधळ करण्यासाठी लोक त्यासाठी रंगांची खरेदी करत आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, असे धोकादायक रंग देखील बाजारात मिळत आहेत. या रंगांमुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. होळीसाठी बाजारपेठा रंगांनी सजल्या आहेत आणि लोक रंगांची उधळपट्टी करत आहेत. पण एक काळजी घेतली नाही तर रंग आयुष्याचा बेरंग करु शकतो. बाजारात अनेक प्रकारचे रंग आहेत. मात्र, इकाफ्रेंडली रंगालाच तुम्हा प्राधान्य द्या. बाजारात असे काही धोकादायक रंगही बाजारात पाहायला मिळत आहेत जे गंभीर आजारांना निमंत्रण देत आहेत. हर्बल कलरच्या नावाने बाजारात विकला जाणारा रंगही अत्यंत घातक आहे. तोही भेसळयुक्त विकला जात आहे. इतकंच नाही तर हर्बल कलरही खूप महाग असून त्याच्या नावावर खूप पैसे वसूल केले जात आहेत. आपली लूट होत असताना असे रंग आपल्या जीवावार बेतू शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
होळीत अनेक प्रकारचे रंग बाजारात पाहायला मिळतात. मात्र, यात काही रंग हे धोकादायक आहेत, ते कॅन्सरसारखे गंभीर आजाराला निमंत्रण देतात. कारण त्यात भरपूर रसायने मिसळली जात आहेत, जी माणसाच्या त्वचेसाठी धोकादायक आहेत. जर तुम्हीही होळीसाठी रंग खरेदी करणार असाल तर अगोदरच काळजी घ्या आणि कोणते रंग धोकादायक आहेत ते जाणून घ्या, ज्यापासून तुम्हाला दूर राहावे लागेल. तुम्ही रंग घेताना केमिकलयुक्त रंग खरेदी करु नका.
होळीत रंगाची मोठ्याप्रणाणत उधळण केली जाते. होळीच्या दिवशी मुलांचा उत्साह खूप असतो आणि ते रंगांचा सण उत्साहात साजरा करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की या भेसळयुक्त रंगांचा सर्वाधिक धोका मुलांना होतो. कारण मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते आणि मुलांची त्वचेला केमिलयुक्त रंग पटकन शोषून घेतात. त्यामुळे या धोकादायक रंगांपासून मुलांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
1. तुम्ही लोकांना होळीवर चांदीचा (silver) रंग लावताना पाहिलं असेल, पण हा रंग सर्वात धोकादायक असतो. चांदीचा रंग हा सर्वात स्थिर असतो आणि तो चमकदार बनवण्यासाठी अॅल्युमिनियम ब्रोमाइड टाकला जातो, ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो.
2. तुम्ही चांदीशिवाय इतर कोणत्याही चमकदार रंगापासून दूर राहावे, कारण ते चमकदार बनवण्यासाठी शिसे त्यात टाकले जाते. त्यामुळे त्वचेला अॅलर्जी होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून, स्वतःला आणि आपल्या मुलांना चमकदार रंगांपासून दूर ठेवा.
3. गुलाल लावल्यानंतर गडद रंग खूप चांगले दिसतात, परंतु ते खूप धोकादायक असतात आणि त्यांच्यापासून दूरच राहावे. कारण, रंग गडद करण्यासाठी, कॉपर सल्फेट टाकले जाते. ते डोळ्यांसाठी खूपच धोकादायक आहे आणि जर असा रंग डोळ्यात गेला तर ते दृष्टी पटलाला धोका पोहोचू शकतात. याशिवाय इतर गडद रंगाचे रंग आणि गुलालही टाळावेत.
1. होळीच्या दिवशी रंग खरेदी करताना चुकूनही असे रंग खरेदी करु नका, ज्यात खूप चमक असेल. कारण, या रंगांमध्ये चमक वाढवण्यासाठी शिशाचे छोटे कण म्हणजेच काचेचे कण टाकलेले असता, जे धोकादायक ठरु शकतात.
2. रंग गडद करण्यासाठी त्यात अनेक प्रकारे रसायने मिसळली जातात, त्यामुळे रंग खरेदी करण्यासाठी गडद रंगांऐवजी हलके रंग खरेदी करा.
3. योग्य रंग विकत घेण्यासाठी तुम्ही ते पाण्यात टाकून देखील ओळखू शकता. यासाठी रंग पाण्यात टाकून रंग पूर्णपणे विरघळला तर ते योग्य आहे. कारण, रासायनिक किंवा काचेचे रंग पाण्यात सहज विरघळत नाहीत.
4. तुम्ही योग्य रंग त्यांच्या वासावरुन देखील ओळखू शकता. रंगात कोणतेही केमिकल किंवा पेट्रोलसारखा वास येत असेल तर समजून घ्या की ते रंग धोकादायक आहेत आणि तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.