Horoscope October 18, 2021: सोमवारी या 6 राशीच्या लोकांचं वाढणार टेन्शन

 सोमवार तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल आणणारा ठरणार 

Updated: Oct 17, 2021, 11:08 PM IST
Horoscope October 18, 2021: सोमवारी या 6 राशीच्या लोकांचं वाढणार टेन्शन

मुंबई: सोमवार तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल आणणारा ठरणार आहे. विशेषतः मेष, कर्क, वृषभ, कन्या, तुला आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर त्याचा मोठा परिणाम होईल. खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी दिवस कसा असणार आहे. 

मेष: सोमवारी आपल्यासाठी चांगला असणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. समजूददारीनं व्यवहार करा. व्यापाऱ्यांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे. 

वृषभ: चांगला उत्साह असणार आहे. आपल्यावर वरिष्ठ अधिकारी मोठी जबाबदारी सोपवतील. नवीन जागा खरेदी करण्याचा योग आहे. 

मिथुन: आपण जो विचार करत आहात त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळणार आहे. व्यापारापासून आपण दूर राहाणंच योग्य ठरेल. घरचे लोक आपल्याला भरपूर आशीर्वाद देतील. 

कर्क: सोमवारी आपल्याकडे अति उत्साह असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आपल्या दिवस चांगला असणार आहे. महिलांनी सावध राहाणं आवश्यक आहे. 

सिंह: सोमवारी आपण पर्सनल काम करणं गरजेचं आहे. करियरमध्ये नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ प्रसन्न राहातील. 

कन्या: तुम्ही नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. परदेशात काम करणाऱ्यांसाठी सोमवार फलदायी ठरेल

तुळ:  सकारात्मक विचार कराल. आपल्यासाठी सोमवारचा दिवस फायदेशीर असणार आहे. 

वृश्चिक: सोमवार तुमच्यासाठी काहीतरी विशेष सिद्ध करू शकतो. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला तणावग्रस्त होऊ देऊ नका. 

धनु: सोमवारी तुम्ही जे वचन देता ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्साहात पैसे खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. 

मकर: महत्त्वाच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे. बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम काळ आहे. क्षेत्रात प्रगतीशील आणि मोठे बदल करण्यासाठी सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

कुंभ: ऑनलाइन खरेदी करू शकता. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा. काही कामात तुम्ही तुमच्या प्रियकराची मदत घेऊ शकता.

मीन: प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांचा आदर करा.

Tags: