रेल्वेचं इंटरनेट फुकट वापरायचंय करा ही सेंटींग आणि वापरा Unlimites Net

रेल्वे स्टेशनवरील मोफत इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी वापरा ही ट्रिक्स

Updated: Sep 10, 2022, 11:14 PM IST
रेल्वेचं इंटरनेट फुकट वापरायचंय करा ही सेंटींग आणि वापरा Unlimites Net  title=

Free Railway Wifi : तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल आणि तुमची ट्रेन उशिराने येणार असेल तर साहजिकच तुम्ही रेल्वे स्टेशनवर इतकावेळ बसून बोर व्हाल. त्यात जर तुमच्या फोनचं इंटरनेटचं स्पीड खराब किंवा एकदम स्लो झालं असेल तर मग तुम्ही वैतागून जाल. मात्र तुम्हाला माहिती नसेल की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मोफत इंटरनेट सुविधा दिली जाते.  पण बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. ही सुविधा तुम्ही कशी वापरू शकता त्यासाठी सविस्तर वाचा.

रेल्वे स्थानकांवर Google RailWire मोफत वायफाय कसं वापराल?

1. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील वायफाय सेटिंग ओपन करावं लागेल.
2. आता तुम्हाला नेटवर्क शोधावं लागेल.
3. यानंतर तुम्हाला RailWire नेटवर्क निवडावं लागेल.
4. आता तुम्ही मोबाईल ब्राउझरवर railwire.co.in वेबपेज उघडा.
5. तिथं तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल.
6. आता तुमच्या नंबरवर OTP पाठवला जाईल.
7. RailWire कनेक्ट करण्यासाठी हा OTP पासवर्ड म्हणून वापरा.
8. Railwire आता सहज जोडले जाईल आणि तुम्ही मोफत इंटरनेट चालवू शकता. 

ही प्रक्रिया सांगण्याचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येकजण रेल्वे स्थानकावर इंटरनेट वापरू शकतो. नेटवर्क गेल्याने रेल्वे स्थानकावरील बहुतांश लोकांचं इंटरनेट नीट चालत नाही. तुम्हाला ही अडचण उद्भवू नये हे लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी हे स्टेप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला सहज समजतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची सत्य अत्यतेची हमी  देत नाही.)