महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? आताच जाणून घ्या

Maharashtra Assembly Share Market:  20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा व्यवहार सुरु राहणार की बंद? याबद्दल इंटरनेटवर सर्च केले जात आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 19, 2024, 06:14 PM IST
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? आताच जाणून घ्या title=
शेअर मार्केट

Maharashtra Assembly Share Market: या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये 3 दिवस सुट्ट्या आहेत. प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवारी शेअर मार्केटमध्ये सुट्टी असते. यावेळी कोणत्याही प्रकारची ट्रेडींग होत नाही. याशिवाय नॅशनल हॉलिडेलाही शेअर मार्केटला सुट्टी असते. या आठवड्यात शनिवार आणि रविवारव्यतिरिक्त 20 नोव्हेंबरला शेअर मार्केट सुरु राहणार की बंद राहणार? याबद्दल प्रश्न विचारला जात आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा व्यवहार सुरु राहणार की बंद? याबद्दल  इंटरनेटवर सर्च केले जात आहे. 

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणूक असल्याने शेअर मार्केट बंद राहणार आहे. म्हणजेच या दिवशी कोणत्याही प्रकारची ट्रेडींग होणार नाही. एनएसईने 8 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे 20 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केट बंद राहील, असे सांगण्यात आले आहे. व्यवहार बंद असल्याने बीएसई आणि एनएसईर इक्विटी, इक्विटी डेरिवेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. त्यावेळी करन्सी डेरिवेटिव्ह सेगमेंट आणि एसएसबी सेगमेंटमध्ये ट्रेडींग होणार नाही. याशिवाय मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंजवर 20 नोव्हेंबर रोजी व्यवहार बंद राहणार आहे. शेअर मार्केटमध्ये केव्हा सुट्टी असते याबद्दल बीएसई आणि एनएसई वर्षाच्या कॅलेंडरमध्ये माहिती देण्यात येते. पण अनेकदा असेही दिवस असतात, ज्यामध्ये सुट्ट्यांची माहिती नसते.अशावेळी बीएसई आणि एनएसई नोटिफिकेशन जाहीर करुन यासंदर्भात घोषणा करते. 

3 दिवस राहणार सुट्टी 

शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात 3 दिवस सुट्टी असेल. मागच्या आठवड्यात 3 दिवस सुट्टी होती. मागच्या आठवड्यात 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्ताने शेअर मार्केट बंद होते. यानंतर शनिवार, रविवारीदेखील सुट्ट होती. या आठवड्यात 20 ऑक्टोबरला निवडणुकीनंतर शनिवार आणि रविवारी शेअर मार्केट बंद असेल. 

पुढच्या महिन्यात 10 दिवस व्यवहार बंद 

पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 10 दिवस शेअर मार्केटमध्ये व्यवहार होणार नाही. यामध्ये 4 शनिवार आणि 5 रविवारचा समावेश आहे. याशिवाय 25 डिसेंबरला ख्रिसमसनिमित्ताने शेअर मार्केट बंद असेल. 

शेअर मार्केटमध्ये आली उसळी 

शेअर मार्केटमध्ये खूप दिवसांनी तेजी पाहायला मिळाली. सेंसेक्सने 1000 अकांनी उसळी घेतली आहे. दुसरीकडे निफ्टीमध्ये 300 अकांनी तेजी पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये आलेल्या या उसळीने गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.