भारतीय जवानांसाठी पाकिस्तान करतं मुलींचा वापर; आणि मग ती होते कधी प्रिया.. तर कधी रिया..

सर्व सिक्रेट डिटेल्स काढून घेण्यासाठी पाकिस्तानी एजंट्स वापरतात मादक सौंदर्य आणि सोबतच हिंदी गाणी. फिल्मी रिल्स बनवून, देवी देवतांचे फोटो वापरूनही जवानांना जाळ्यात ओढलं जातं.

Updated: May 29, 2022, 05:37 PM IST
भारतीय जवानांसाठी पाकिस्तान करतं मुलींचा वापर; आणि मग ती होते कधी प्रिया.. तर कधी रिया..   title=

सर्व सिक्रेट डिटेल्स काढून घेण्यासाठी पाकिस्तानी एजंट्स वापरतात मादक सौंदर्य आणि सोबतच हिंदी गाणी. फिल्मी रिल्स बनवून, देवी देवतांचे फोटो वापरूनही जवानांना जाळ्यात ओढलं जातं. एकदा लष्करी अधिकारी जा जाळ्यात अडकले की की मग काढून घेतली आते सर्व कॉन्फिडेन्शियल आणि टॉप सिक्रेट माहिती.  

असा सुरु होता पाकिस्तानकडून (Pakistan) हनीट्रॅपचा (Honey Trap)  खेळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कॅंटोन्मेंट भागातून हा हनीट्रॅपचा (Honey Trap )  खेळ सुरू असल्याचं बोललं जातंय. या भागातील स्थानिक गरीब मुलं मुलींना शोधून त्यांना खास नोकरीवर ठेवलं जातं. यानंतर त्यांना खास ट्रेनिंगही दिलं जातं. ज्या भारतीय जवानाला (Indian Army ) टारगेट केलं जातं, त्यांच्या स्थानिक भाषेची माहितीही या एजंट्सना पुरवली जाते. खासकरून भारतातील राजस्थान किंवा गुजरातसारख्या सीमावर्ती भागातील लष्करी माहिती मिळवण्यासाठी अशा मुलींचा, तरुणींचा वापर केला जातो.

सौंदर्याचं जाळं आणि शिकार भारतीय जवान..

हिंदी सिनेमाची गाणी (bollywood Song) , देवी देवतांचे फोटो आणि सोबतच आंबट विषय. रिल्स तर अशा बनवतात की ते पाहून जवान जाळ्यात अडकला पाहिजे. एकदा या मादक सौंदर्याच्या (Hot Beauty) मायाजालात जावं अडकला की संपलाच समजा. एकदा एखादा जवान या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला की तो अगदी टॉप सिक्रेट लीक करण्यात अजिबात मागेपुढे पाहत नाही. हनीट्रॅपमध्ये जवान अडकण्याच्या अशाच काही बातम्या समोर आल्या आणि तपास यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली.
याबाबत सत्य घटना तर तेंव्हा समोर आली जेंव्हा एका राजस्थानमधील जवानाची अशाच एका घटनेत चौकशी झाली. चौकशीनंतर त्या जवानाने एक एक करून मोठ-मोठे खुलासे केले. यानंतर संपूर्ण प्रकारची चौकशी गुप्तचर विभागाकडून केली गेली, अजूनही तपास सुरु आहे. या तपासातून अखेर समोर आलं की पाकिस्तानी महिला ISI एजंटनी कसं भारतीय जवानाला स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून हनीट्रॅपमध्ये अडकवलं.  

आणि सुरु झाला ISI च्या जाळयात अडकवण्याचा खेळ  

पाकिस्तानला देशाच्या लष्कराची गुप्त माहिती दिल्याच्या (ISI)  आरोपाखाली पकडण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे प्रदीप कुमार (Pradeep Kumar) . या जवानाचं वय आहे अवघे २४ वर्ष. हा जवान मूळचा उत्तराखंडमधील रुरकीचा. 3 वर्षे ते जोधपूरमध्ये (Jodhapur) तैनात होते. नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा या जवानाने त्या पाकिस्तानी महिला ISI एजंटशी फोनवर संभाषण केलं आणि तेंव्हापासून सुरु झाला जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न. ( Pakistan Army ) 

पाच वेगवेगळी नावं.. कधी प्रिया (priya), तर कधी रिया (Riya)

पायल शर्मा, हरलीन कौर पासून कधी प्रिया शर्मा, तर कधी रिया शर्मा... ही तीच नावं आहेत जी ISI एजंट्स स्वतःसाठी वापरत असत. याच नावाने सोशल मीडियावर रिल्सचं जाळं विणलं जायचं आणि साधला जायचा जवानांवर निशाणा.    

एका रिलमध्ये हिंदी गाण्याचा वापर करण्यात आला ज्यामध्ये, "आंखों के नीचे-नीचे, मैं तेरे पीछे-पीछे..." या वाक्यांचा वापर करून बनवला जातो एक मादक रील आणि तिथेच सुरवात होते मायाजाल विणायला.
 
दुसऱ्या रिलमध्ये एक मुलगा म्हणतो,  "अकेला हूं मैं.."

मग ती महिला म्हणते,  "साथ हूं मैं..."

लगेच मुलगा म्हणतो, "पता है आज बहुत उदास हूं मैं..."

त्यावर पुन्हा मुलगी म्हणते, "नजर उठा के देख..तेरे पास हूं मैं..."

आणि या व्हिडीओमध्ये ती एजंट पुन्हा पुन्हा मादक सौंदर्याचा वापर करतच असते

हिंदू असल्याचं भासवायला काही फोटोंचा वापर

यामध्ये स्वतः हिंदू असल्याचं भासवायला काही फोटोंचा देखील वापर केला जातो. या फोटोंमध्ये एजंट महिला हिंदू देव देवतांची पूजा करतानाचे फोटो देखील शेअर करते. हे फोटो पाहून ती एक भारतीय महिला आहे म्हणून भासवलं जातं.

यानंतर सुरु झाला व्हिडीओ कॉलिंग चा खेळ आणि गंदी बात...  

यानंतर सुरु होतो गंदा धंदा आणि व्हिडीओ कॉलिंगचा खेळ. सदर प्रकरणात अनेकदा एकमेकांशी बोलताना या महिनेने कधी दिल्लीत भेटू तर कधी लग्नच करू अशी आमिषं दाखवली. कधी कधी व्हिडीओ कॉलवर आंबट विषय काढून कपडे ही उतरवले. याच व्हिडिओंचा वापर करून नंतर सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ.    

एकदा अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग सुरु झालं की जवान काहीही करायला तयार होतात. अगदी सिक्रेट गोष्टीही सांगण्यास मागे पुढे पाहत नाहीत. जवान प्रदीप कुमारही महिला गुप्तहेरांच्या जाळ्यात अशाच प्रकारे अडकला. या महिला एजंटने जी काहीकागदपत्रं किंवा गुप्त माहिती मागितली ती सर्व माहिती एजंटला पाठवायला सुरुवात केल्याचं बोललं जातं.

मिसाईल परीक्षणाशी संबंधित माहिती पुरवल्याचा अंदाज

ISI च्या हनीट्रॅपमध्ये अडकलेला भारतीय लष्कराचा गनर प्रदीप याने पोखरणमधील क्षेपणास्त्र चाचणीच्या व्हिडिओसह अनेक गुप्त माहिती, व्हिडिओ तसंच फोटोही पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्याचा अंदाज आहे. सांगितलं जातंय की या पाकिस्तानी एजंटच्या प्रेमात हा जवान एवढा वेडा झाला की त्यानं त्या महिलेशी आपल्या इतर सात साथीदार मित्रांचीही ओळख करून दिली. तपास यंत्रणांकडून आता या सातही जवानांचीही चौकशी केली जातेय.  

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या सेनेतील गनर प्रदीप कुमारला या ISI महिला  एजंटने आपलं नाव रिया सांगून मैत्री केलेली. सोबतच आपण बंगळुरूमधील मिलिटरी नर्सिंगमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं. यासोबतच आपण हिंदू आहोत हे भासवायला तिनं आपल्या खोलीतील हिंदू देव देवतांचे फोटो लावलेले. या तसबिरींसोबत काढलेले फोटोही तिने शेअर केलेले. यावरून जवानाला ही सदर महिला हिंदूच असल्याचं भरवसा झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही एजंट या जवानाशी अस्खलित राजस्थानी भाषेत संवाद साधायची. म्हणूनच या जवानाला कधीही या एजंटचा संशय आला नाही. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेने आतापर्यंत तब्बल दहा जवानांना हनीट्रॅपमध्ये अडकावल्याचं बोललं जातंय. या महिलेने ही सर्व माहिती ISI ला पुरवल्याचंही बोललं जातंय.