बाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स

How to fing coriander powder is real or fake : तुमच्या मसाल्याच्या डब्यात असणारे किती मसाले अस्सल आहेत आणि किती बनावट असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का ?   

Updated: May 27, 2023, 11:23 AM IST
बाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स  title=
बाजारत मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स

How to fing coriander powder is real or fake : भारतामध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये पदार्थांची चव वाढवण्यासाठी ते पदार्थ दीर्घकाळ टीकून राहावेत यासाठी काही मसाल्यांचा वापर केला जातो. पदार्थ चमचमीत करण्यासाठी ज्याप्रमाणे त्यात लाल तिखट, गरम मसाले मिसळले जातात अगदी त्याचप्रमाणे पदार्थांच्या चवीमध्ये समतोल राखण्यासाठीसुद्धा काही मसाल्यांचा वापर होतो. यातील एक म्हणजे धणे किंवा धने पूड. 

सहसा गृहिणी घरीच धणे आणून ते भाजून त्यानंतर त्याची पूड करतात. फक्त जेवणातच नव्हे, तर ही पूड अनेक शारीरिक व्याधींवरही उपाय म्हणून वापरली जाते. हल्लीकडे वेळेअभावी आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळं मोठा महिलावर्ग तयार मसाले, धनेपूड खरेदी करण्याला प्राधान्य देताना दिसतो. 

बाजारात सध्याच्या घडीला मोजून थकाल इतक्या ब्रँडच्या आणि इतक्या पद्धतीच्या धनेपूड उपलब्ध आहेत. पण, त्या सगळ्याच उत्तम दर्जाच्या किंवा अस्सल आहेत का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही देता येणार नाही. कारण, अनेकदा तुम्हीही अस्सल आणि बनावट धनेपूड यांच्यात गोंधळला असाल. दूध, डाळी, मावा या साऱ्यांमध्ये भेसळ होत असताना धनेपूडही भेसळ होऊन बाजारात विकली जात आहे. 

धनेपूडमध्ये काय मिसळतात? 

आता तुम्ही म्हणाल धनेपूडमध्ये कशाची भेसळ करतात? याचं उत्तर दिलं आहे रिसर्च जनरल ऑफ फार्मेसी अँड टेक्नोलॉजीनं. त्यांच्या माहितीनुसार धनेपूडमध्ये माळरानावरचं सुकलेलं गवत भेसळ करत मिळलं जातं. रानात वाढलेलं गवत त्याचा रंग धण्यांसारखा होईपर्यंत ते उन्हात वाळवून त्याची पूड केली जाते. धण्यांचं प्रमाण कमी आणि हा गवत, भुशाचा भुगा जास्त असं प्रमाण मिसळत ही भेसळ केली जाते. धक्का बसला ना वाचून? 

यापुढे बाजारात जेव्हाजेव्हा धनेपूड खरेदीसाठी जाल, तेव्हातेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगा.  अस्सल धनेपूड ओळखण्यासाठी एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात ही पूड मिसळा. 10 सेकंदांसाठी पाणी तसंच ठेवा. जर, तुम्हाला धनेपूड पाण्यावर तसंगताना दिसतेय तर त्यात भेसळ आहे हे लक्षात घ्या. जी पूड ग्लासच्या तळाशी जाऊन बसतेय तीच अस्सल धनेपूड आहे हे ओळखा. 

हेसुद्धा वाचा : बिअर, वाईन ग्लासात वेगवेगळ्या पद्धतींनी का ओततात, Pouring ची योग्य पद्धत माहितीये? 

आणखी एक मार्ग म्हणजे, अस्सल धण्यांपासून तयार करण्यात आलेली धनेपूड सुगंधी असते. तिला धण्यांचा ताजा सुगंध असतो. तर, गवत, भुगा मिसळलेली पूड अजिबातच सुवासिक नसते. त्यामुळं इथून पुढे तुम्ही जर धनेपूड खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर, या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या.