पीएफ'साठी आधार कार्डचा नवा फायदा । जाणून घ्या

 नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्प्लॅाई प्रोव्हिडंट फंड (EPFO) खूप महत्वाचा असतो

Updated: Nov 30, 2018, 07:22 PM IST
पीएफ'साठी आधार कार्डचा नवा फायदा । जाणून घ्या title=

मुंबई:  नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्प्लॅाई प्रोव्हिडंट फंड (EPFO) खूप महत्वाचा असतो. हा एक प्रकारचा सेवानिवृत्तीसारखा प्लॅान आहे.  यामध्ये गुंतवणुकीचा फायदा दीर्घ मुदतीनंतर प्राप्त होतो.  सेवानिवृत्तीच्यावेळी केलेल्या विथड्रॅाल क्लेमने अॅक्युमुलेटेड प्रोव्हिडंट फंड मिळतो. या आधी लोकं नोकरी बदलताना फंड ट्रांन्सफर करत होते. पण्, गेल्या काही वर्षांमध्ये ईपीएफओच्या रिकव्हरी क्लिअरन्ससाठी अधिक अर्ज पाहिले गेले होते. याच कारणाने PF फंडच्या प्रक्रियेला अधिक सोपं करण्यात आल आहे.

या आधी ईपीएफओने पैसे काढणे आधिक सोपे केलं आहे. आता PF ऑनलाईनमार्फत सोप्या पद्धतीने काढता येतात. यासाठी काही प्रोसेस पूर्ण करावे लागते.

जर तुम्ही आधारकार्ड EPFO सोबत लिंक केल्यावर याचा प्रोसेसिंग टाईम ३-४ दिवसांचा आहे. EPFO सेटलमेन्टला आणखी लवकर बनवण्याचा तयारीत आहे. 

असे झाल्यास अर्ज करण्याच्या काही तासातच पैसे काढले जाऊ शकतात. यासाठी पीएफ अकाउंटची केवायसी करणे गरजेचं आहे. 
ऑनलाईन विथड्रॉल क्लेमसाठी माहिती खालीलप्रमाणे:

सर्वात महत्वाचे

अकाउंट होल्डरसाठी EPFO युनिव्हर्सल अकाउंट नंबर जारी करतो. एकदा हे जनरेट केल्यावर, तुम्ही नोकरी बदलताना पैसे काढू नका.
 
असे केल्यास नवीन युनिव्हर्सल अकाउंट नंबर जारी केला जाईल. युनिव्हर्सल अकाउंट नंबरचं अॅक्टिव्हिटेड होणे गरजेचं आहे.
मेम्बरचा मोबाईल नंबर यूएएन डेटाबेसवर रजिस्टर होणे आवश्यक आहे.

सदस्यचा आधार तपशील ईपीएफओ वेबसाइटवर असावे.

सदस्यचा बॅंक तपशील यूएएन प्रविष्ट केले असावे.

सदस्यचा पॅन देखील ईपीएफओ डेटाबेसमध्ये असणे आवश्यक आहे.

नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्लॅाई प्रोव्हिडंट फंड हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

कसे करणार अप्लाय 

ईपीएफओच्या सदस्यांना ई-सेवा पोर्टल https:unifiedportal-mem.epfindia.gov.in यावर लॅाग इन करावे लागेल.

पैसे काढण्याची प्रक्रिया

लॉगईन केल्यानंतर, आपण बेस आधारित ऑनलाईन क्लेम  सबमिशन टॅब निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर सदस्याला केवायसी माहिती वेरीफाय करावं लागणार. 

 

क्लेम विथड्रॅाल करण्यासाठी वेग-वेगळ्या विकल्पांमधील ऑप्शन निवडणे आवश्यक आहे.

प्रक्रिया कशी पूर्ण होईल?

ईपीएएफओकडून तुम्हाला युआयडीएआय डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवलं जाईल. 

ओटीपी एन्टर केल्यानंतर क्लेम फॅार्म सबमिट होतो. असे केल्याने विथड्रॅाल प्रोसेस सुरू होतात.  क्लेम प्रोसेस झाल्यानंतर ईम्प्लॅाइच्या रजिस्टर बॅंक अकाउंटमध्ये रक्कम टाकली जाते. 

 दक्षता बाळगा

ईपीएफओ सदस्यला ऑनलाईन सुविधेचा उपयोग करण्यासाठी नियोक्ताकडे जाण्याची गरज नाही. पण त्याचाजवळ ईस्टॅाबॅलिशमेन्ट नंबर असणे गरजेचे आहे.

डेटाबेसमध्ये नोंदणी केलेला आणि ईपीएफओमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर एकचं असणे गरजेचं आहे.