गरोदरपणात आलियासारखं स्टायलिश दिसायचय तर असे निवडा कपडे,या टीप्स देतील स्टायलिश लूक..

  सध्या आलिया भट्टचा प्रेग्नेंसी लूक सगळ्यांनाच आवडला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कम्फर्टनुसार लूज-फिटिंग आणि स्टायलिश कपडे निवडताना दिसतेय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कपड्यांमध्ये ती बेबी बंप सहज लपवताना दिसतेस.  

Updated: Jul 29, 2022, 03:00 PM IST
गरोदरपणात आलियासारखं स्टायलिश दिसायचय तर असे निवडा कपडे,या टीप्स देतील स्टायलिश लूक..  title=

FASHION TIPS:  सध्या आलिया भट्टचा प्रेग्नेंसी लूक सगळ्यांनाच आवडला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कम्फर्टनुसार लूज-फिटिंग आणि स्टायलिश कपडे निवडताना दिसतेय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कपड्यांमध्ये ती बेबी बंप सहज लपवताना दिसतेस.  
जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल. या स्टायलिंग टिप्स फॉलो करू शकता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

 सैल कपडे निवडा

 जर तुम्ही गरोदर असाल आणि बेबी बंप दाखवण्यास संकोच वाटत असेल तर स्वत:साठी सैल कपडे निवडा.  एक नंबर, मोठ्या आकाराचे कपडे फक्त पोट लपवण्यासाठी कामी येणार नाहीत तर  त्यात तुम्हाला आरामदायकसुद्धा वाटेल. आजकाल मोठ्या आकाराच्या शर्ट (ओवर साईज शर्ट ) आणि कपड्यांचा ट्रेंड आहे.  अशा प्रकारे, तुम्हाला ट्रेंडी लुक सहज मिळेल.

डिझाइनकडे विशेष लक्ष द्या

तुम्ही असे काही कपडे निवडावे जे पोटाजवळून पूर्णपणे सैल असतील. उदाहरणार्थ, तुम्ही जीन्स घातली असेल तर तुम्ही पेप्लम टॉप घालू शकता.  दुसरीकडे, आलिया भट्टप्रमाणे, शरारासोबत ट्यूनिक किंवा पेप्लम डिझाइन कुर्ता निवडा. पहिल्या सहा महिन्यांपर्यंतचा बेबी बंप त्यात सहज लपवता येतो.

आलिया भट्टने ट्रेलर लॉन्चसाठी अतिशय स्मार्ट लूज फिटिंग बलून शेपचा ड्रेस निवडला होता.  त्यामुळे पार्टीला जात असाल तर बलुन स्टाईलचे कपडे निवडा. ते खूप आरामदायक आहेत आणि बेबी बंप त्यात सहज लपवता येईल