तुम्हीच खरे आंबा पंडित! खरेदी करण्याआधी पाहा या 5 टीप्स; एक रुपयाही वाया जाणार नाही

हे फळ आहे, आंबा. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या या आंब्याचे नाना प्रकार, तितक्याच बहुविध जाती. 

Updated: May 18, 2022, 12:46 PM IST
तुम्हीच खरे आंबा पंडित! खरेदी करण्याआधी पाहा या 5 टीप्स; एक रुपयाही वाया जाणार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : उन्हाळा सुरु झाला की, वाढत्या तापमानानं डोकं चक्रावण्याची भीती असतेच. पण, या भीतीला दूर सारते ती म्हणजे उत्सुकता. उत्सुकता एका अशा फळाची, जे वर्षातून तीन- एक महिन्यांसाठी आपल्याकडे येतं आणि अक्षरश: आपल्याला वेड लावतं. (how to shop ripped  sweet mango know the tips )

हे फळ आहे, आंबा. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या या आंब्याचे नाना प्रकार, तितक्याच बहुविध जाती. अशा या आंब्याची चव चाखण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक असतो. हे फळ आवडत नाही, असं म्हणणारे फार कमी. (Mango rates )

आंबा खाण्यापेक्षाही तो तयार होऊन आपल्या हाती येण्यापर्यंतची प्रक्रियासुद्धा तितकीच रंजक. ही सर्व मेहनतच इतकी असते म्हणूनच की काय आंब्याची विक्री इतक्या महाग दरात होते. 

आंबा खरेदी करताना आपण जितके पैसे मोजतो ते पैसे आंब्याच्या चवीनं सार्थकी लागतात. पण, हेच विकत घेतलेले आंबे आतून खराब किंवा निगोड निघाले तर मात्र आपला हिरमोड होतो. हेच टाळण्यासाठी चला जाणून घेऊया आंबा गोड आहे हे ओळखण्यासाठीच्या काही टीप्स. 

- आंबा खरेदी करतेवेळी हातात उचलल्यानंतर फळाचा स्पर्श अतिशय महत्त्वाचा असतो. पिकलेला आणि गोड आंबा हवा असल्यास तो जरा नरम असल्यास लगेचच खाता येऊ शकतो. 

- एखाद्या आंब्याची एक बाजू नरम आणि दुसरी टणक असेलल तर असा आंबा घेणं टाळा. इथं तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. 

- आंबा खदेरी करत असताना त्याचा सुगंधसुद्धा फारच महत्त्वाचा. ज्यावेळी आंबा हातात घेतला जातो तेव्हाच त्याचा सुगंधही घ्यावा. तेव्हाच तो पिकला आहे की नाही, नैसर्गिकरित्या पिकवला आहे ना हे लक्षात येतं. 

- सुगंध नसलेला आंबा खरेदी करणं टाळाच... 

- आंबा खरेदी करतेवेळी रंगालाही तितकंच महत्त्वं द्या. एखादा आंबा मध्येच पिवळसर, मध्येच केशरी, मध्येच हिरवा असल्यास तो खरेदी करु नका. 

- आंब्याच्या देठाच्या विरुद्ध दिशेला असणारा भाग हलकासा दाबून पाहिल्यास तो भाग जोर न लावताच दबला गेला तर आंबा खाण्यासाठी तयार आहे असं ओळखा.