नवरा गावाला येताच जीवानिशी गेला; दोन बायकांनीच केली हत्या, कारण...

Husband Killed By Two Wifes: दोन्ही बायकानी आपल्याच नवऱ्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2023, 04:27 PM IST
नवरा गावाला येताच जीवानिशी गेला; दोन बायकांनीच केली हत्या, कारण... title=
husband stabbed to death police- held his two wife

Crime News Today: दोन बायकांनी मिळून त्यांच्याच पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलमगीर अन्सारी (45 वर्ष) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. आलमगीरने सहा महिन्यांपूर्वीच दुसरा निकाह केला होता. पत्नीसह तो गावाला आला असतानाच दोन्ही पत्नींनी मिळून त्याची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. तसंच, या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. 

आलमगीर अन्सारी हा बिहारमधील रायपुरा गावातील रहिवासी आहे. अन्सारी दिल्लीत राहत होता. तर तिथेच काम करुन उदरनिर्वाह चालवत होता. आलमगीर अन्सारीचे 10 वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते. सलमा त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. ती सारण जिल्ह्यातील चिन्तामनगंज गावातील आहे. लग्नानंतर थोड्याच दिवसात दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यामुळं सलमाने आलमगीर अन्सारीपासून वेगळी राहू लागली. दोघांमध्ये काहीच संपर्क होत नव्हता. त्यामुळं सहा महिन्यांपूर्वी आलमगीरने दिल्लीत जाऊन मूळची बंगालची असलेली अमीनासोबत दुसरं लग्न केलं. 

मयत अलमगीर अन्सारीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आलमगीरची पहिला पत्नी सलमा दिल्लीत पोहोचली होती. तिथे गेल्यानंतर तिने तिची सवत म्हणजेच पतीची दुसऱ्या बायकोची भेट घेतली. त्यानंतर तिला घेऊन माहेरी आली. तिथे दोघीही एकत्र राहू लागल्या. 

दिल्लीत राहणारा आलमगीर बकरी इदच्या निमित्ताने तो गावाला आला होता. पती गावच्या घरी आल्याचे कळताच दोघीही त्याला भेटण्यासाठी घरी गेल्या. सासरी आल्यानंतर तिघांमध्ये एका क्षुल्लक गोष्टीवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की सलमाने पती आलमगीरवर जीवघेणा हल्ला केला. 

पत्नीच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या आलमगीरला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्याला डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात भरती करावे असे सांगितले. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात जात असतानाच आलमगीरचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी अन्सारीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे व शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच, लगेच कारवाई करत सलमा आणि अमीनाला आलमगीरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दोन्ही पत्नींना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, अन्सारीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. व आरोप दोन्ही पत्नींवर केला आहे. पोलिस या प्रकरणी हत्येच्या कारणांचा तपास करत आहेत.