भारतातील सर्वात मोठ्या IPO ने गुंतवणूकदारांचं केलं मोठं नुकसान; किती मिळणार रिटर्न?

Hyundai IPO Listing: देशातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंडईची मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली.

Pravin Dabholkar | Updated: Oct 22, 2024, 01:36 PM IST
भारतातील सर्वात मोठ्या IPO ने गुंतवणूकदारांचं केलं मोठं नुकसान; किती मिळणार रिटर्न? title=
ह्यूंडई आयपीओ

Hyundai IPO Listing: देशातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंडईची मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली. या लिस्टिंगनने गुंतवणूकदारांना चांगलेच निराश केले आहे. बीएसईवर हा आयपीओ इश्यू प्राइसच्या तुलनेत 29 रुपयांच्या नुकसानीने लिस्ट झाला. याची इश्यू प्राइस 1960 रुपये होती. अशावेळी बीएसईवर लिस्टिंग 1.48 टक्के खाली होऊन 1931 रुपये झाली. एनएसईवर या आयपीओला काही कमाल दाखवता आली नाही. याची लिस्टिंग 1.33 टक्के नुकसानीनंतर 1934 रुपयांवर झाली.  

अपेक्षित सबस्क्रिप्शन मिळाले नाही

या आयपीओची इश्यू प्राइज 27 हजार 870 कोटी रुपये होती. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे म्हटले जात होते. या आयपीओला खुला झाला तेव्हा पहिल्या दिवशी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. ती केवळ 18 टक्के भरली गेली. असे असताना यात तिसऱ्या दिवशी काहीशी वाढ झाली. शेवटच्या दिवसापर्यंत 2.37 वेळा सबस्क्राइब झाला. हा IPO जितका मोठा होता, त्या तुलनेत याला तितके सबस्क्रिप्शन मिळाले नाही.

ग्रे मार्केटमध्ये काय परिस्थिती होती?

ह्युंडाईच्या या आयपीओला सुरुवातीपासून ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला नाही. ह्युंडाई आयपीओ आदल्या दिवशी त्याचा जीएमपी 45 रुपयांपर्यंत खाली आला होता. ज्या दिवशी IPO उघडला, त्या दिवशी GMP 63 रुपयांपर्यंत वाढला होता. पण त्यानंतरही त्यात घसरण सुरूच राहिली. आयपीओ बंद झाला त्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये तोट्यात होता. आज सूचीबद्ध होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये त्याची जीएमपी 48 रुपये होती. याचा अर्थ ह्यूंडई आयपीओ 2.45 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. यामुळे ग्राहकांची चांगलीच निराशा झाली आहे.

'यांनी' दाखवला  सर्वाधिक उत्साह 
ह्यूंडई आयपीओबद्दल क्वालिफाइड इंस्टिट्यूशन बायर्समध्ये (QIB) सर्वाधिक उत्साह दिसून आला. या श्रेणीतील उपलब्ध समभागांपेक्षा 6.97 पट अधिक बोली लागल्या होत्या. त्याचवेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी 0.50 पट बोली लावली होती. नॉन इंस्टिट्यूशन गुंतवणूकदारांनी आपल्या साठी आरक्षित 2,12,12,445 समभागांच्या तुलनेत साधारण 86 लक्ष 72 हजार 251 समभागांसाठी बोली लावली. जी 0.6 पट इतकी होती.