आणखी एका बाबाचा पर्दाफाश, आठ महिने तरूणीवर बलात्कार

राम रहिमनंतर आता उत्तरप्रदेशातील एका बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका तरूणीच्या कथित बलात्कारप्रकरणी या बाबाला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Sep 28, 2017, 02:14 PM IST
आणखी एका बाबाचा पर्दाफाश, आठ महिने तरूणीवर बलात्कार title=

सीतापूर : राम रहिमनंतर आता उत्तरप्रदेशातील एका बाबाचा पर्दाफाश झाला आहे. एका तरूणीच्या कथित बलात्कारप्रकरणी या बाबाला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

या तरूणीने आरोप केला आहे की, या बाबाने तिला जबरदस्तीने आठ महिने डांबून ठेवलं आणि तिच्यावर सतत बलात्कार केला. इतकेच नाही तर या बाबाच्या अनेक शिष्यांनीही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने लावला आहे. 

पोलिसांनुसार, पीडितेच्या एका नातेवाईकाने ५० रूपयांमध्ये तिला बाबाच्या एका शिष्येला विकले होते. त्यानंतर पीडितेला आधी लखनौला नेण्यात आले आणि त्यानंतर बाबाच्या मिसरिख येथील आश्रमात नेण्यात आले. इथेच तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले. 

पीडितेनुसार, बाबाने तिचा एक एमएमएस सुद्धा बनवला असून त्याद्वारे तो तिला नेहमीच धमकवत आलाय. तिला नंतर आग्रा येथील एका आश्रमात नेण्यात आलं. इथे आठ महिने तिच्यावर इतर लोकांकाडून सतत बलात्कार झाल्याचं तिचं म्हणणं आहे. 

त्यानंतर पुन्हा तिला मिसरिख येथील आश्रमात परत आणण्यात आलं. आणि इथेही तिच्यावर बलात्कार झाला. या तरूणीच्या हाती बाबा मोबाईल फोन लागला आणि तिने पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला. हा बाबा एक मुलींची शाळा चालवतो. पीडितेने असाही आरोप लावला आहे की, बाबा या शाळेच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवतो. आणि राजकीय लोकांना शाळेतील मुली सप्लाय करतो. बाबाने या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.