VIDEO: शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला

शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षिका बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 28, 2017, 01:09 PM IST
VIDEO: शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला  title=

नवी दिल्ली : शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षिका बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका शाळेतील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक शिक्षिका वर्गामध्ये विद्यार्थ्याला डस्टरने मारत आहे. शिक्षिकेने केलेल्या या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

कानपूरमधील स्टेपिंग स्टोन इंटरमीडिट कॉलेजमधील ही घटना आहे. येथील आठव्या इयत्तेत शिकणारा अभिनव हा वर्गात गप्पा मारत असल्याने त्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केली आहे.

शिक्षिका मारत असताना अभिनव मागे सरकतो. मात्र, ती शिक्षिका अभिनवच्या मागे जाऊन त्याला डस्टरने मारहाण करते. अभिनवला केलेली मारहाण इतकी गंभीर होती की त्याचा हातच फ्रॅक्चर झाला आहे.

या प्रकरणी अभिनवच्या वडिलांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मात्र, शिक्षिकेने मारहाण केली असल्याचा आरोप फेटाळला. पण, वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमुळे शिक्षिकाचं खोटं पकडलं गेलं.