नवी दिल्ली : भारतीय औद्योगिक विकास बँकेने (IDBI BANK) आपल्या ग्राहकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यात 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नियमांविषयी माहिती देण्यात आली आहे. यापुढे ग्राहकांना वर्षाला केवळ 20 पानांचं निशुल्क चेकबुक मिळेल. यानंतर प्रत्येक चेकसाठी 5 रुपये भरावे लागणार आहेत.
IDBI बँकेत खातं खोलणाऱ्या ग्राहकांना पहिल्या वर्षात 60 पानांचं चेकबुक निशुल्क देण्यात येतं. एका वर्षानंतर 50 पानांचं चेकबुक दिलं जातं. पण आता बँकेने नवी नोटीस जारी करत चेक लीफ चार्ज (Chque Leaf Charge), सेविंग अकाउंट चार्ज (Saving Account Charge) आणि लॉकर चार्जच्या (Locker Charge) नियमात बदल केला आहे.
बँकेने जारी केलेल्या नोटीशीत बचत खातं असणाऱ्या ग्राहकांना नवे नियम लागू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.