Diwali Bhai Dooj Panchang 3 november 2024 in marathi : आज यमद्वितीया म्हणजे दिवाळी भाऊबीज आहे. आज चंद्राला विशेष महत्त्व असतं. आकाशात चंद्राची कोर निघाल्यावर बहिणी आधी चंद्राची पूजा करतात आणि नंतर लाडक्या भावाचं औक्षण करतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. तर आज सौभाग्य योग, शोभन योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. (sunday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (sunday panchang 3 november 2024 bhau beej or Bhai Dooj Muhurt Diwali panchang in marathi )
वार - रविवार
तिथी - द्वितीया - 22:07:31 पर्यंत
नक्षत्र - अनुराधा - पूर्ण रात्र पर्यंत
करण - बालव - 09:18:44 पर्यंत, कौलव - 22:07:31 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सौभाग्य - 11:38:37 पर्यंत
सूर्योदय - 06:34:53
सूर्यास्त - 17:34:09
चंद्र रास - वृश्चिक
चंद्रोदय - 08:07:00
चंद्रास्त - 18:30:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:59:16
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक
या दिवशी सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील. त्यानंतर शोभन योग लागेल. त्यामुळे भाऊबीजेसाठी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त असेल.
दुष्टमुहूर्त - 16:06:15 पासुन 16:50:12 पर्यंत
कुलिक – 16:06:15 पासुन 16:50:12 पर्यंत
कंटक – 10:14:38 पासुन 10:58:35 पर्यंत
राहु काळ – 16:11:45 पासुन 17:34:09 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:42:32 पासुन 12:26:30 पर्यंत
यमघण्ट – 13:10:27 पासुन 13:54:24 पर्यंत
यमगण्ड – 12:04:31 पासुन 13:26:56 पर्यंत
गुलिक काळ – 14:49:20 पासुन 16:11:45 पर्यंत
अभिजीत - 11:42:32 पासुन 12:26:30 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)