मुंबई : आजच्या युगात, कॉन्टॅक्टलेस पेमेंटमुळे क्यूआर कोडचा (QR Code) वापर झपाट्याने वाढला आहे. क्यूआर कोडमुळे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. परंतु क्यूआर कोडच्या वाढत्या वापरामुळे, त्याच्याशी संबंधित धोके देखील वाढू लागले आहेत. काही लोक इतरांची फसवणूक करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. परंतु एसबीआयने वापरकर्त्यांना सतर्क केले आहे की क्यूआर कोड कधीही पैसे घेण्यासाठी वापरले जात नाहीत त्याचा वापर नेहमी पैसे देण्यासाठी केला जातो. म्हणून जर कोणी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा QR कोड स्कॅन करण्यास सांगितले तर असे करु नका
जर तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे देत असाल, तर त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
जर तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात, दुकानात गेलात किंवा दूध घेत असाल तर, क्यूआर कोड (क्विक रिस्पॉन्स) सर्वत्र पेमेंटसाठी वापरला जातो. यामुळे दोन फायदे होतात एक म्हणजे कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम होते आणि दुसरे म्हणजे पेमेंट करणे देखील सोयीचे होते.
म्हणूनच लोकांना क्यूआर कोडद्वारे पैसे देणे आवडते. तसेच, रोख रक्कम नेण्याच्या त्रासापासून ही वाचले जाते. या व्यतिरीक्त आपण पैसे कधी आणि कुठे खर्च केले याचा रेकॉर्ड देखील मिळतो. परंतु आजकाल फसवणुकीसाठी क्यूआर कोडचा वापर केला जात आहे.
एसबीआयने आपल्या वापरकर्त्यांना सतर्क केले आहे की, क्यूआर कोड कधीही पैसे देण्यासाठी वापरे जाते, ते पैसे घेण्यासाठी वापरले जात नाहीत. QR कोड एक प्रकारची स्थिर प्रतिमा आहे, ती हॅक केली जाऊ शकत नाही, परंतु काही लोकं फसवणूकीसाठी तुम्हाला आमिष दाखवून QR कोड स्कॅन करण्यास प्रोत्साहित करू शकतात. म्हणजे तुम्हाला पैसे देतोय असे तुम्हाला सांगताता परंतु ते तुम्हालाच कोड स्कॅन करायला लावतात. परंतु खरेतर तुम्हाला जर कोणाकडून पैसे घ्यायचे असेल तर, त्याने तुमचा कोड स्कॅन केला जातो.
तसेच तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवा की, कोणाकडून ही पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करु नका तसेच तुमचा पिन देखील टाकू नका.
जेव्हाही तुम्हाला विशिष्ट रक्कम पाठवण्यास सांगितले जाते, तेव्हा Google Pay, BHIM, SBI Yono, Yono इत्यादी UPI अॅप्स वापरून QR कोड स्कॅन करा आणि नंतर व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी रक्कम आणि तुमचा UPI पिन टाका.
QR म्हणजे क्विक रिस्पॉन्स. क्यूआर कोड साधा दिसू शकतो, परंतु तो स्वतःमध्ये बरेच डेटा साठवण्यास सक्षम आहे. क्यूआर कोडमध्ये कितीही डेटा असला तरी स्कॅनिंग केल्यानंतर लगेचच त्यात प्रवेश करता येतो. म्हणूनच त्याला क्विक रिस्पॉन्स कोड असेही म्हणतात. क्यूआर कोड हा बारकोडचा एक प्रकार आहे, जो डिजिटल डिव्हाइसद्वारे सहज वाचता येतो. क्यूआर कोडचा वापर उत्पादनाविषयी माहिती ट्रॅक करण्यासाठी केला जातो.
आजकाल बर्याच स्मार्टफोनमध्ये एक अंतर्निर्मित क्यूआर रीडर आहे, जो बहुतेक वेळा जाहिरात मोहिमांसाठी वापरला जातो. टोयोटाची उपकंपनी डेन्सो वेव्ह या जपानी कंपनीने 1994 मध्ये पहिल्या QR कोड प्रणालीचा शोध लावला होता. उत्पादन प्रक्रियेदरम्यान वाहने आणि गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी त्यांना अधिक अचूक मार्ग आवश्यक होता. म्हणून त्यांनी बारकोडचा प्रकार विकसित केला.
बारकोड आणि क्यूआर कोडमधील फरक असा आहे की मानक बारकोड फक्त एकाच दिशेने वाचता येतात - वरपासून खालपर्यंत. याचा अर्थ असा की तो फक्त थोड्या प्रमाणात माहिती साठवू शकतो. ते सहसा अल्फान्यूमेरिक स्वरूपात असतात, परंतु क्यूआर कोड दोन दिशानिर्देशांमध्ये वाचले जातात - वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे. यात भरपूर डेटा साठवण्याची सोय असते.
क्यूआर कोड एक स्थिर प्रतिमा आहे, जी हॅक केली जाऊ शकत नाही, परंतु ती कोणीही सहज बदलू शकतो. क्यूआर कोडसह सर्वात मोठा धोका म्हणजे आपण स्कॅन करेपर्यंत कोडच्या मागे काय आहे हे आपल्याला कळणार नाही. आज विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड वापरले जात आहेत, जिथे वापरकर्ता फक्त त्यांच्या बँकिंग ऍपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करतो. त्यामुळे एखादा फसवणूक करणारा व्यक्ती स्वत: QR कोड तयार करू शकतो. ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.