'या' भारतीय कंपनीत कामाचे दिवस फक्त 4, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

कंपनी गेल्या सात महिन्यांपासून आपले मुंबई कार्यालय शुक्रवारी बंद ठेवत आहे.

Updated: Sep 28, 2021, 01:21 PM IST
'या' भारतीय कंपनीत कामाचे दिवस फक्त 4, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय title=

मुंबई : भारतीय आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. एका मोठ्या धोरणात्मक बदलामध्ये, सायबरसुरक्षा कंपनी TAC सिक्युरिटी चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या पॉलिसीवर काम करणार आहे . TAC सिक्युरिटी गेल्या सात महिन्यांपासून आपले मुंबई कार्यालय शुक्रवारी बंद ठेवत आहे, ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दीर्घ विकेंडचा आनंद घेता येत आहे.

या आयटी कंपनीचा दावा आहे की, यामुळे चांगली उत्पादनक्षमता निर्माण झाली आहे. कंपनीचे मत आहे की, जर ही पॉलिसी कामगारांना अधिक उत्पादनक्षमता देणारे आणि आनंदी बनवत असेल तर ही पॉलिसी मुंबई कार्यालयात कायमस्वरूपी पाळली जाईल, असे कंपनीने सोमवारी सांगितले आहे.

TAC सिक्युरिटीने एक अंतर्गत सर्वेक्षण केले ज्यामध्ये असे दिसून आले की 80% टीममेंबर आठवड्यातील 4 दिवस जास्त तास काम करण्यासाठी तयार आहेत. यामुळे त्यांना मोठा विकेंड मिळतो, ज्यामुळे ते आपल्या खासगी आयुष्यासाठी आणि आपल्या ग्रोथला वेळ देऊ शकताता. कंपनी ने असे केल्यानंतर पाहिले गेले आहे की, बहुतांश टीम मेंबरने लाँग विकेंडमुळे वेगवेगळ्या कोर्सेससाठी स्वत:ला एनरोल केले आहे, ज्यामुळे त्यांची प्रर्सनल ग्रोथ देखील होत आहे, ज्याचा त्यांना आणि कंपनीला फायदाच होईल.

टीएसी सिक्युरिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिशनीत अरोरा म्हणाले, "हे सर्व कार्यप्रणालीचे मानक उच्च ठेवण्याबाबत आहे, तरीही आम्ही टीमचे आरोग्य आणि कल्याण प्रथम ठेवत आहे." टीएसी सिक्युरिटी कंपनीचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे आणि ते कंपन्यांसाठी असुरक्षितता व्यवस्थापनासाठी कार्य करतात.

कोविड -19च्या उद्रेकापासून, जगभरातील कंपन्या चार दिवसांच्या कामाच्या आठवड्यांनुसार काम करत आहेत. त्यापैकी काहींनी, विशेषत: नॉर्डिक प्रदेशात, त्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. असे वृत्त आहेत की  the new labour code संस्थां त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम करण्यासाठी सहकार्य करत आहे. जर कर्मचारी दिवसात 12 तास काम करत असतील तर हे लागू केले जाईल.