१८३३ कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त...

आयकर विभागाने बेकायदेशीर संपत्तीवर छापा टाकण्याचे काम चालू केले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 7, 2017, 09:53 AM IST
१८३३ कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त...  title=

नवी दिल्ली : आयकर विभागाने बेकायदेशीर संपत्तीवर छापा टाकण्याचे काम चालू केले आहे. त्यात आतापर्यंत १८३३ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सीबीडीटी ने आज यासंदर्भात माहिती दिली. सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्र यांनी सांगितले की, आयकर विभागाने बेकायदेशीर संपत्तीविरोधात कठोर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. 

त्यांनी सांगितले की, "हा तपास बंद होणार नाही, याचे मी आश्वासन देतो. यासंदर्भात आम्ही उपलब्ध स्रोतांना रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. यांसारख्या अधिक संपत्तीचा शोध घेतला जाईल आणि त्या जप्त केल्या जातील." ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या आकड्यांनुसार १८३३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

यांसारखे सर्वाधिक म्हणजेच १३६ केसेस अहमदाबादमध्ये झाल्या. यानंतर भोपाळमध्ये ९३ तर गोवा, कर्नाटकमध्ये असे ७६-७६ केसेस समोर आल्या. तर जयपूरमध्ये ६३, मुंबईमध्ये ६१ आणि दिल्लीत ५५ केसेस हाती लागल्या आहेत.