मुंबई : आणखी एक चक्रीवादळ येत्या 24 तासात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ मोठ्या भयंकर वादळात रुपांतरीत होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदल आणि वायु सेनेकडून अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. या चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाचे (IMD)राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून (NWFC)सांगण्यात आले की, यास (YAAS) उत्तर-वायव्येकडे जात असताना, सोमवारी पहाटे ते चक्रीवादळ वादळामध्ये रूपांतरित होईल आणि येत्या 24 तासांत ते उग्ररुप धारण करु शकते. चक्रीवादळ तीव्र वादळात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उपग्रह आणि समुद्राच्या गतीशीलतेच्या सहाय्याने घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर यावर भाष्य करण्यात आले आहे. ( yaas may change in cyclone today navy and air force ready )
हवामान खात्याने म्हटले आहे की, चक्रीवादळ यास (Cyclone Yaas) उत्तर-वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि हळूहळू ते तीव्र होईल. 26 मे पर्यंत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या सीमेजवळ उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचेल. 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत वादळ म्हणून पारादीप आणि सागर बेटांच्या दरम्यान उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल ओलांडणे अपेक्षित आहे.
दरम्यान, ‘यास’ (Yaas) चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्याचे तिन्ही दल आणि आयसीजीने अनेक पावले उचलली आहेत. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, "पश्चिम किनाऱ्यावरील एचएडीआर आणि बचाव कार्यामुळे भारतीय नौदलाने यापूर्वी भुवनेश्वर आणि कोलकाता येथे 10 एचएडीआर पॅलेट वितरित केले आहेत आणि पोर्ट ब्लेअरवर पाच पॅलेट तयार आहेत." भारतीय नौदलाला चार डायव्हर्स आणि 10 बचाव तुकड्यांची कोलकाता, भुवनेश्वर आणि चिलिका येथे यापूर्वी मदत फौज तैनात करण्यात आली आहे, जेणेकरुन अल्पावधी सूचनेवरून नागरी प्रशासनाला मदत करता येईल.
संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय वायुसेना (Indian Navy)चक्रीवादळ 'यास' मुळे (Yaas) उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीसाठी जामनगर, वाराणसी, पाटणा, अरोकोनम आणि नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 950 जवान, कर्मचारी आणि 70 टन जरुरी सामान आणि इतर आवश्यक वस्तू संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअर येथे ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटणा, वाराणसी आणि अरक्कनम येथून पाच सी -130 विमानांचा वापर करून मदत साहित्य, उपकरणे आणि जवानांची वाहतूक केली गेली आहे.
याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाने (IAF) एचएडीआर (मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण) ऑपरेशनसाठी 11 सी विमान वाहतूक तीन सी -130, चार एएन -32 विमान आणि दोन डोर्नियर विमानांचा समावेश केला आहे. याव्यतिरिक्त, 11 एमआय -17 व्ही 5, दोन चेतक, तीन चित्ता आणि सात एमआय -17 हेलिकॉप्टरसह सुमारे 25 हेलिकॉप्टर्स कोणत्याही परिस्थितीत तयार ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरामध्ये गेलेल्या 254 बोटींना माघारी बोलावून सुरक्षित परतीची खात्री केली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की एनडीआरएफच्या 31 टीम, नौका, लाइफ जॅकेट्स इत्यादी सज्ज ठेवण्यात आले आहेत.