देशातील नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी, सर्वाधिक पगारवाढीची शक्यता

salary will increase next year : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी अर्थात 2022 मध्ये देशात 9.3 टक्के वेतनवाढीची शक्यता आहे.  

Updated: Oct 21, 2021, 11:00 AM IST
देशातील नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी, सर्वाधिक पगारवाढीची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : salary will increase next year : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी अर्थात 2022 मध्ये देशात 9.3 टक्के वेतनवाढीची शक्यता आहे. विलीस टॉवर्स वॉटसनचा दिलासादायी अहवालात यावर भाष्य करण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर उद्योगांसह विविध क्षेत्रात चांगली कामगिरी झाल्याने पगारवाढीचे संकेत मिळत आहेत. एशिया पॅसिफीकमध्ये भारतात सर्वाधिक पगारवाढीची शक्यता आहे. 

विलीस टॉवर्स वॉटसनने सॅलरी बजेट प्लॅनिंग नावाचा अहवाल सादर केला. त्यात हे दिलासादायी मत मांडण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर उद्योगांमध्ये नवा आशावाद निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोबदला चांगला मिळेल अशी स्थिती आहे. एशिया पॅसिफीक क्षेत्रात भारत हा सर्वाधिक पगारवाढ होणारा देश ठरेल. 2022 मध्ये देशात 9.3 टक्के इतक्या वेतनवाढीची शक्यता आहे.

2022 मध्ये भारतातील कर्मचाऱ्यांचे वेतन सरासरी 9.3 टक्के वाढेल. 2021 मध्ये 8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. ग्लोबल कन्सल्टिंग, ब्रोकिंग आणि सोल्युशन्स कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या 'सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्ट' मध्ये म्हटले आहे की, कंपन्यांसमोर आव्हान कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे आहे. अशा स्थितीत 2022मध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ देतील.

 अहवालात म्हटले आहे की, भारताला पुढील वर्षी आशिया-पॅसिफिकमध्ये सर्वाधिक वेतनवाढ दिसेल. पुढील 12 महिन्यांत व्यवसाय दृष्टीकोनात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 30 टक्के कंपन्या पुढील एका वर्षात नवीन नियुक्त्यांची तयारी करत आहेत. 2020 च्या तुलनेत हे जवळपास तिप्पट आहे. 

या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त भरती होईल. अभियांत्रिकी (57.5 टक्के), माहिती तंत्रज्ञान (53.3 टक्के), तांत्रिक कौशल्ये (34.2 टक्के), विक्री (37 टक्के) आणि वित्त (11.6 टक्के) अशा विविध क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या नोकऱ्यांसाठी ही भरती होईल. तसेच या नोकऱ्यांमध्ये कंपन्या जास्त पगार देतील, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.