Relationship Lies - लहान मुलं, महिला, पुरुष सर्वचजण अनेकदा खोटं बोलतात. खोटं बोलणं हा मानवी स्वभाव आहे. अनेकदा एखाद्या कठीण प्रसंगातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी पटकन खोटं बोललं जातं. अनेकदा काहीतरी सत्य लपवण्यासाठीही खोटं बोललं जातं. रिलेशनशिपमध्ये तुम्ही अनेकांना सर्रास खोटं बोलताना पाहिलं असेल. आपल्या पार्टनरला असुरक्षित वाटू नये, आपल्या पार्टनरला वाईट वाटू नये म्हणून सर्रास खोटं बोललं जातं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही कॉमन वाक्यांबाबत सांगणार आहोत जे मुलं आपल्या गर्लफ्रेंडला किंवा पत्नीला कायम बोलतात.
अनेकदा आपल्या पार्टनरचं मन जिंकण्यासाठी पुरूष त्यांच्याशी खोटं बोलतात. मी कायम तुझ्याच विचारात असतो, असं पुरुष अनेकदा बोलतात. मात्र हे तेवढंच खोटं असतं.
मुलं आपल्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीला अनेकदा हे खोटं बोलतात. मुलं अनेकदा बोलतात, तूच एक अशी मुलगी आहेस जिच्यावर माझं प्रेम आहे. अनेकदा मुलं आपल्या पार्टनरला असुरक्षित वाटू नये म्हणून किंवा भूतकाळातील रिलेशन्स लपवण्यासाठी यासारख्या कारणांचा वापर करतात.
असे अनेक प्रसंग येतात जेंव्हा पुरुष आपल्या पार्टनरसोबार्ट कुठेतरी बसलेले असतात. अचानक तिथून दुसरी मुलगी किंवा महिला जाते. पुरुषाचं लक्ष तिच्यावर जातं. मात्र जेंव्हा पार्टनर याबाबत त्याला विचारते, तेंव्हा ते काहीतरी कारण काढून, मी तर तिला पाहत नव्हतोच किंवा मी कोणत्यातरी विचारात गुंतलो होतो असं उत्तर देतात.
रिलेशनमध्ये असं अनेकदा होतं, जेंव्हा पार्टनरला मुलांच्या स्मोकिंगवर आक्षेप असतो. म्हणून अनेक पुरुष किंवा मुलं आपल्या पार्टनरला, "मी कधीही स्मोकिंग केलेलं नाही किंवा मी स्मोकिंग कायमचं सोडलं" अशी उत्तर देतात. अनेकदा पार्टनरला भेटल्यानंतर असे पुरुष किंवा मुलं स्मोकिंग करतात.
अनेकदा एका रिलेशनशिपमध्ये असताना पुरुष इतर मुलीकडे आकर्षित होतात. अशात ते सर्रास खोटं बोलतात की, ते सिंगल आहेत.
अनेकदा आपण सिनेमात पाहिलं असेल की अभिनेता अभिनेत्रीला म्हणतो की, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तू जवळ नसलीस की माझा जीव कासावीस होतो, मला एकटं एकटं वाटतं. ही सेम ट्रिक अनेक मुलं किंवा पुरुष आपल्या पार्टनरसोबत वापरतात. आपल्या पार्टनरला मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही असं सांगतो. मात्र हे खोटं असतं. जशी आपल्या पार्टनरची पाठ फिरली की थेट सुरु होते पार्टी.
कुणाही मुलीचं मन जिंकण्यासाठी मुलं किंवा पुरुष हे खोटं बोलतात की लग्नआधी ते अजिबात इंटिमेट होणार नाही. मात्र एकदा मुलगी त्यांना हो म्हणाली, की सर्व गेम बदलतो.
( विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)