आता PAN Card वरुन मिळणार पैसे! जाणून घ्या कसं

आजकाल आपण पर्सनल लोनद्वारे आपल्या पैशांची समस्या दूर करु शकतो.

Updated: Aug 7, 2022, 04:45 PM IST
आता PAN Card वरुन मिळणार पैसे! जाणून घ्या कसं  title=
trending news personal loan through pan card know its eligibility and process of applying in maratha

PAN Card: पॅन कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत अकाऊंट (Account Opening) उघडण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्न  (Income Tax Return) फाइल करण्यापर्यंत सगळ्या कामासाठी पॅन कार्डची (PAN Card) आवश्यकता असते. 18 वर्षांनंतरच्या प्रत्येक तरुणाकडे PAN Card असणे गरजेचं आहे. आता या PAN Card द्वारे तुमची पैशांची चिंताही मिटू शकते. आजकाल आपण पर्सनल लोनद्वारे आपल्या पैशांची समस्या दूर करु शकतो. आता तुम्ही PAN Card द्वारेही पर्सनल लोन घेऊ शकता. 

आजकाल अनेक जण काही ना काही कारणासाठी लोन घेतात. त्यामुळे लोन घेणाऱ्या ग्राहकांना CIBIL स्कोअर हा शब्द माहिती असेलच. कारण या CIBIL स्कोअरच्या आधारे तुम्हाला लोन द्यायचं की नाही हे ठरतं. या CIBIL स्कोअरद्वारे ग्राहकांच्या कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड तपासला जातो. त्यासोबतच ग्राहकांचे उत्पन्न आणि पैसे परत करण्याची क्षमता बघितली जाते. जर तुम्हाला 50 हजारांपर्यंत पर्सनल लोन घ्यायचे असेल, तर तुम्ही पॅन कार्डद्वारे सहज हे लोन मिळवू शकता. (trending news personal loan through pan card know its eligibility and process of applying in maratha)

पर्सनल लोनसाठी काय करावे लागेल?

जर तुम्हाला 50 हजारांचे पर्सनल लोन कोणत्याही सुरक्षिततेशिवाय हवं असेल तर आता तुमच्याकडे फक्त पॅन कार्ड असणे गरजं आहे. पॅनकार्डवरुन तुमचा सिबिल स्कोअरच्या आधारावर बँकेकडून पर्सनल लोन मिळू शकतं. 

या पर्सनल लोनसाठी कुठल्याही कारणाची गरज नाही

साधारण कार लोन, होम लोन किंवा बिझनेस लोन घेताना तुम्हाला त्याबद्दलचे कागदपत्रे दाखवावे लागतात. तसंच तो पैसा तुम्हाला त्या गोष्टीसाठीच खर्च करावा लागतो. मात्र पॅन कार्डवरील लोनद्वारे मिळालेला पैसा तुम्ही हवं त्या गोष्टीसाठी खर्च करु शकता. अगदी आपल्या वैयक्तिक खर्चासाठी या लोनच्या पैशांचा वापर करु शकता.