Income Tax Returns | आतापर्यंत इतक्या कोटी लोकांनी भरला ITR, तुम्ही भरला का?

Income Tax Returns | ITR भऱण्याची मुदत संपत आली आहे. 

Updated: Mar 16, 2022, 08:34 PM IST
Income Tax Returns | आतापर्यंत इतक्या कोटी लोकांनी भरला ITR, तुम्ही भरला का? title=

नवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्याची मुदत संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आयकर रिटर्न भरण्याचं आवाहन आयकर विभागाकडून (Ministry of Finance) करण्यात येत आहे. आयकर विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च 2022 पर्यंत, 6.63 कोटी करदात्यांनी नवीन ई-फायलिंग पोर्टलवर रिटर्न भरले आहेत. 15 मार्च 2022 ही कंपन्या आणि करदात्यांना रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती ज्यांना कर लेखापरीक्षण अहवाल भरायचा होता. गेल्या वर्षी 4.77 लाखांच्या तुलनेत 15 मार्च 2022 रोजी 5.43 लाख ITR दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांत १३.८४ लाख आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. (Income Tax Return file on New portal)

आर्थिक वर्ष 2021-22 साठी 6.63 कोटी ITR दाखल केले गेले आहेत. 3.03 कोटी करदात्यांनी ITR फॉर्म क्रमांक-1 दाखल केला आहे, जो एकूण फायलिंगच्या 46% आहे. 9 टक्के करदात्यांनी ITR फॉर्म क्रमांक-2 भरला आहे. ज्याचा आकडा 57.6 लाख आहे. 26 टक्के करदात्यांनी ITR-4 फॉर्म भरला आहे. 2% करदात्यांनी ज्यांनी ITR फॉर्म-5 भरला आहे, ज्यांची संख्या 15.1 लाख आहे. ITR-6 हा 9.3 लाख करदात्यांनी तर ITR-7 हा 2.18 लाख लोकांनी भरला आहे. 15 मार्च 2022 पर्यंत, मूल्यांकन वर्ष 2020-21 च्या तुलनेत 16.7 लाख अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत.

आयकर विभागाच्या मते, 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी दाखल केलेल्या 6.63 कोटी ITR पैकी 6.01 ITR सत्यापित केले गेले आहेत, ज्यामध्ये 75 टक्के आधार OTP द्वारे केले गेले आहेत. सत्यापित ITR पैकी, 5.17 कोटी ITR वर प्रक्रिया करण्यात आली आहे आणि 15 मार्च पर्यंत 1.83 कोटी करदात्यांना परतावा जारी करण्यात आला आहे.

आयकर विभागाने म्हटले आहे की, ITR उशीरा भरण्याची आणि आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 (31 March 2022) आहे.