Income Tax Saving Tips: 10 लाख रुपयांवरही भरावा लागणार नाही टॅक्स, कसं ते जाणून घ्या

कर कायद्यांमध्ये असा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा योग्य वापर करुन तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता.

Updated: Feb 18, 2022, 04:34 PM IST
Income Tax Saving Tips: 10 लाख रुपयांवरही भरावा लागणार नाही टॅक्स, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपल्या उत्पन्नावरती टॅक्स भरावा लागतो. ज्यामुळे बरेच लोक आपलं टॅक्स वाचवण्यासाठी काहीना काही मार्ग शोधत असतात.  तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं टॅक्स वाचवू शकता. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि तुम्हाला टॅक्स भरावा लागेल अशी भीती वाटत असेल, तर काळजी करु नका. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे. कारण 10 लाख रुपयांचे उत्तपन्न असलेले व्यक्ती इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येताता.

परंतु हे लक्षात घ्या की सध्याच्या कर कायद्यांमध्ये असा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा योग्य वापर करुन तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता.

कर तज्ज्ञांच्या मते, समज तुम्ही वार्षिक 10 लाख रुपये कमावता. तर या प्रकरणात, तुम्हाला 50,000 रुपयांचं स्टॅऩ्डर्ड डिडक्शन होतं, यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न रु.9.5 लाखांवर येते.

मग, या व्यतिरिक्त, तुम्ही 80C अंतर्गत कर बचत योजनांमध्ये (जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, मुलांचे शुल्क इ.) गुंतवणूक करून 1.50 लाखांपर्यंत सूट मिळवू शकता. असे केल्याने तुमचे करपात्र उत्पन्न 8 लाखांवर येते.

तसेच हे उत्पन्न आणखी कमी करण्यासाठी तुम्ही NPS चा लाभ घेऊ शकता. याद्वारे करपात्र उत्पन्न आणखी 50 हजार रुपयांनी कमी करता येईल. याशिवाय, तुम्ही तुमच्या आरोग्य विम्याद्वारे 25 हजार रुपये आणि तुमच्या पालकांच्या आरोग्य विम्याद्वारे 25 हजार रुपयांची सूट मिळवू शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न आता ७ लाख रुपये होईल.

त्यानंतर, जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्ही त्याद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजात सूट मिळवू शकता. आता तुमचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपये असेल.

परंतु 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सरकार कलम 87 (ए) अंतर्गत 12,500 रुपयांची कर सवलत देते. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी होईल. ज्यामुळे तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. हे उत्पन्न कलम 87A अंतर्गत पूर्ण सूट मिळण्यास पात्र आहे.

त्यामुळे या गोष्टींचा वापर करुन तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता.