Independence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण

स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.   

Updated: Aug 14, 2023, 01:24 PM IST
Independence Day 2023: 15 ऑगस्टला  लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण?  हे आहे खास कारण title=

Independence Day:  देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंगा फडकावणार आहेत. इथूनच ते देशाला सलग दहाव्यांदा संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी जवळपास 1800 पाहुण्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं आहे.  या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे  सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार, सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल योजना आणि इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळालं.  ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighter) आणि क्रांतिकारकांच्या लढ्यामुळे मिळालेलं हे स्वतंत्र सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश उभा राहिला पाहिजे हे स्वप्न स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलं होतं. त्यातून देशात मोठी स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. इंग्रजांनी ही चळवळ मोडण्याचे अनेक प्रयत्न केले. पण शेवटी त्यांना हार मानावी लागली आणि अखेर भारत देश सोडून जावंच लागलं.

4 जुलै 1947 ला भारताच्या स्वातंत्र्याबाबतचं विधेयक सादर करण्यात आलं. पुढच्या 15 दिवसात हे विधेयक एकमताने संमत करण्यात आलं. या विधेयकात 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश शासन काळ समाप्त होईल असं नमुद करण्यात आलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट1947 ला तिरंगा ध्वज फडकवला (Flat Hosting). त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. पुढच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान लालकिल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरील ब्रिटीश ध्वज उतरवून त्याठिकाणी तिरंगा फडकविण्यात आला. आणि तेव्हापासून दिल्लीतला लाल किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं..

या पंतप्रधानांना फडकवता आला नाही लालकिल्ल्यावरुन ध्वज
देशातचे दोन पंतप्रधान असे होते त्यांना ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन तिरंगा  फडकवता आला नाही. काँग्रेसचे गुलझारीलाल नंदा दोनदा पंतप्रधान झाले.  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदा तर लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांना दुसऱ्यांदा काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आलं. पहिल्यांदा 27 मे ते 9 जून 1964 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. दुसऱ्यांदा 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 या काळात ते पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान झाले. दोन्हीवेळा ते 13 दिवसांचे पंतप्रधान होते मात्र, त्यांच्या दोन्ही कार्यकाळात 15 ऑगस्ट आला नाही. 

त्यानंततर चंद्रशेखर हे दुसरे पंतप्रधान होते ज्यांना लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. चंद्रशेखर हे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात ऑगस्ट महिना आला नाही. त्यामुळे ते देखील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाही.

लाल किल्ल्यावरुन सर्वाधिकवेळा तिरंगा फडकावणारे पंतप्रधान
लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा मान पंडित नेहरू यांना जातो.  पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ते मे 1964 या कालावधीत सलग 17 वेळा तिरंगा फडकवला. दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात 16 वेळा तिरंगा फडकवला. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून 10 वेळा ध्वजारोहण केले.

काँग्रेसेतर पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक वेळा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आहे. पंतप्रधान मोदी यांची पंतप्रधान म्हणून ही सलग दहावी वेळ आहे. 2014 पासून पीएम मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत. त्याआधी भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांना 6 वेळा लालकिल्ल्यावरुन तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला. 

यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी हे काम 6 वेळा केले. अटलबिहारी वाजपेयींना पहिल्या टर्ममध्ये तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी 6 वेळा तिरंगा फडकवला.