मुंबई : रीयूनियन हे नेहमीच खास असतं. बऱ्याच वर्षांनंतर अचानक आपल्याला कोणी भेटलं तर तेव्हा आपला आनंद हा गगनात मावेनासा होतो. 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीला वर्षे उलटून गेली असली तरी, या फाळणीच्या जखमा आजही अनेक कुटुंबांच्या हृदयात ताज्या आहेत. देशाचा फाळणीमुळे केवळ दोन देशच नाही तर अनेक कुटुंब देखील एकमेकांपासून वेगळे झाले, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी असेच एक कुटुंब विभक्त झालं होतं. जेव्हा भारतीय सिका खान (Sika Khan) आपल्या पाकिस्तानी भावाला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. सिका हे शीख मजूर असल्याचे म्हटले जाते आणि वसाहतवादी राजवटीच्या शेवटी ब्रिटनने उपखंडाचे विभाजन केल्यामुळे ते फक्त सहा महिन्याचे असताना त्यांचे मोठे भाऊ सादिक खानपासून विभक्त झाले. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले. सांप्रदायिक हत्याकांडात सिकाचे वडील आणि बहीण मरण पावले पण अवघ्या दहा वर्षांचे सादिक येथून निसटून पाकिस्तानात पोहोचले.
पंजाबमधील भटिंडा येथे त्यांच्या साध्या विटांच्या घरात राहणारे सिका म्हणाले, 'माझ्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली. मला गावकरी आणि काही नातेवाईकांच्या दयेवर सोडण्यात आले आणि त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. आपल्या भावाबद्दल अधिक जाणून घेण्याची सिका यांची इच्छा लहानपणापासूनच होती. पण हे सगळं तीन वर्षांपूर्वी ते राहत असेलल्या परिसरातील एका डॉक्टरांच्या मदतीशिवाण होऊ शकलं नाही. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि या दोन भावांची भेट झाली. पाकिस्तानी यूट्यूबर नासेर ढिल्लॉनच्या अनेक फोन कॉल्स आणि मदतीनंतर, सिका सादिकशी पुन्हा भेटले.
38 वर्षीय नसीर म्हणाले की तो आणि त्याचा शीख मित्र भूपिंदर सिंग यांनी त्यांच्या YouTube चॅनलद्वारे 300 कुटुंबांना एकत्र केले आहे. अखेरीस कर्तारपूर कॉरिडॉरवर भाऊंची भेट झाली. एक दुर्मिळ व्हिसा-मुक्त क्रॉसिंग जे भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानमधील तीर्थस्थळी जाण्यास मदत करतो. दोन्ही देशांमध्ये असलेलं शत्रुत्व असले तरी, हा कॉरिडॉर 2019 मध्ये सुरु केला आणि त्या दुरावलेल्या अशा अनेक कुटुंबांसाठी एकत्र येणाचं कारण ठरला.