गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री चीनचा तंबू पेटला; अन् सैनिक भडकले- व्ही.के. सिंह

यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली.

Updated: Jun 29, 2020, 11:40 AM IST
गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री चीनचा तंबू पेटला; अन् सैनिक भडकले- व्ही.के. सिंह title=

नवी दिल्ली: भारत आणि चीन India China face off यांच्यातील गलवान खोऱ्यातील Galwan valley रक्तरंजित संघर्षाबाबत केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट उघड केली. गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री चिनी लष्कराच्या तंबूला अचानक आग लागली. त्यानंतर दोन्ही बाजूचे सैनिक आक्रमक झाल्याचे व्ही. के. सिंह VK Singh यांनी सांगितले. 

भारत आणि चीन यांच्यात लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूचे सैन्य मागे घेण्यात येईल, असे ठरले होते. मात्र, १५ जूनच्या रात्री कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैनिकांची तुकडी प्रत्यक्ष ताबा रेषेवर LAC पाहणी करण्यासाठी गेली तेव्हा चिनी सैनिक त्याठिकाणी तळ ठोकून बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या परिसरात एक तंबुही लावला होता. हा तंबू उखडून टाकण्यासाठी भारतीय सैनिक पुढे सरसावले. मात्र, त्यावेळी तंबूला अचानक आग लागली. यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली, असे व्ही.के. सिंह यांनी सांगितले. या हाणामारीत चीनचे ४० हून अधिक जवान मारले गेल्याचा दावाही व्ही.के. सिंह यांनी केला.

चिनी सैन्यांच्या हालचालींवर भारताची नजर, सीमेवर सैन्यांची संख्या दुप्पट
 
गलवान खोऱ्यातील या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर ७० पेक्षा अधिक भारतीय जवान जखमी झाले होते. यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. 
या प्रकारानंतर लडाखमध्ये भारतीय सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय, सीमेवर शत्रूच्या विमानांचा वेध घेण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टीम बसवण्यात आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्था पीएलएकडून लष्करातील अधिकाऱ्यांना मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. आतापर्यंत जवळपास २० मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांना चिनी सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी तिबेटमध्ये पाठवण्यात आलं आहे.चीनकडून केली जाणारी ही तयारी आणि सीमेपलीकडे सुरु असणाऱ्या एकंदर हालचाली पाहता भारतही आता 'घातक प्रहार करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय सैन्याशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये घातक कमांडोच्या तुकडीला खास असं ४३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.