भारत-चीन तणाव : १९६२ वर्ष आठवा.... पवारांचा राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधींना चोख उत्तर 

Updated: Jun 27, 2020, 06:53 PM IST
भारत-चीन तणाव : १९६२ वर्ष आठवा.... पवारांचा राहुल गांधींवर निशाणा  title=

मुंबई : भारत-चीन तणावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण केलं जाऊ नये. गलवान घाटीत भारत चीन सीमा प्रश्नावर काँग्रेस केंद्र सतत हल्ला करत आहे. शरद पवारांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्षेत्रात चीनने जे आक्रमण केलं त्यावर सरेंडर केलं आहे असा राहुल गांधीचा आरोप होता. या आरोपाला पवारांनी उत्तर दिलं आहे. 

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष गलवान घाटीत १५ जूनला भारता आणि चीन सैन्यात झालेल्या वादावर सतत टीका करत आहे. काँग्रेस पक्षाने पुढे सांगितलं की, पंतप्रधानांनी या परिस्थितीनंतर जनतेसमोर येऊन नेमकं काय घडलं ते सांगायला हवं. 

यावर शरद पवार म्हणाले की, १९६२ चं साल आपण विसरता कामा नये. चीनने भारतातील ४५ हजार चौरस कि.मी. क्षेत्राचा ताबा घेतला तेव्हा काय झाले हे आम्ही विसरू शकत नाही. सध्या त्यांनी काही जमीन काबीज केली आहे हे मला माहित नाही, परंतु यावर चर्चा करताना आम्हाला भूतकाळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांचे राजकारण केले जाऊ नये. शरद पवारांचा राहुल गांधींच्या टीकेवर निशाणा साधला आहे.

 माजी संरक्षण मंत्री सतारा यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालची गोष्ट विसरू शकत नाही. जेव्हा चीनने भारतातील ४५ हजार वर्ग किमीचे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले होते. हे आरोप करण्याची वेळी नाही. पण राहुल गांधींनी भूतकाळात काय झालं? हे देखील पाहायला हवं. हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा आहे याचं राजकारण व्हायला नको.