India Covid Update: देशात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला, दिल्लीत सापडले नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

दिल्लीत सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा नवा प्रकार

Updated: Jul 10, 2022, 11:35 AM IST
India Covid Update: देशात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला, दिल्लीत सापडले नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

India Covid Update: भारतात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे एकूण 18,257 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,36,22,651 इतकी झाली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात कोविड-19 चे सक्रिय रुग्ण 1,28,690 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोविड प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. शनिवारी देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.

महाराष्ट्र आणि दिल्लीत कोविड परिस्थिती
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 2790 नव्या रुग्णांची नोंद झालीआहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत गेल्या चोवीस तासात 544 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

दिल्लीत ओमिक्रॉनचे नवे व्हेरिएंट 
दरम्यान, डब्ल्यूएचओने (WHO) दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार आढळून आला आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे नवीन व्हेरिएंट  BA-4 आणि BA.5 ची प्रकरणे आढळून आली आहेत.  तज्ञांनी म्हटले आहे की घाबरण्याची गरज नाही कारण या उपप्रकारामुळे गंभीर संक्रमण होत नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x