Kota Student Suicide: राजस्थानमधल्या कोटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची (Girl Student Suicide) प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची JEE Mains ची परीक्षा होती. विद्यार्थिनीच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थिनीने परीक्षाचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या पत्रात विद्यार्थिनीने आई-वडिलांसाठी एक संदेश लिहिलाय. यात तीने म्हटलंय 'मम्मी-पप्पा मी JEE करु शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी वाईट मुलगी आहे. आई-बाब मी माफी मागते, माझ्याकडे हाच शेवटचा पर्यात होता' असा तीने लिहून ठेवलं होतं.
राजस्थानमधल्या कोटातल्या एका कोचींग सेंटरमध्ये 18 वर्षांची ही मुलगी JEE Mains ची तयारी करत होती. या मुलीची 31 जानेवारीला परीक्षा होती. याची ती तयारी करत होती. पण परीक्षेपूर्वीच तीने राहात्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कोचिंग क्लासमधून घरी आल्यानंतर तीने हे टोकाचं पाऊल उचललं.
या घटनेच्या एकआठवड्यापूर्वीच कोटात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्याचं वयही 17 ते 18 वर्ष होतं. मृत विद्यार्थी उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मुरादाबाद जिल्ह्यात राहाणारा होता.
2023 मध्ये 30 विद्यार्थ्यांची आत्महत्या
कोटात गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये तब्बल 30 विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि अभ्यास्याच्या दबावामुळे आत्महत्या केली. आता या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आत्महत्येच्या दोन घटना घडल् आहेत. 24 जानेवारी 2024 ला नीटच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.
शिक्षण मंत्रालयाकडून निर्देश
कोटात विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे शिक्षण मंत्रालायने कोचिंग संस्थांसाठी नवे निर्देश जारी केले होते. या निर्देशांनुसार 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये दाखला देता येणार नाही, तसंच चांगले मार्क किंवा रँक देण्याचं विद्यार्थ्यांना आश्वासन देता येणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 25 हजार, दुसऱ्या वेळेस 1 लाख रुपये आणि तिसऱ्या वेळा आढळल्यास कोचिंग सेंटरचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची या नियमात तरतूद करण्यात आली आहे. नीट आणि जेईई मेन्स परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी कोटा इथं राहातात.
Disclaimer
आपल्या किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींच्या ओळखीतील एखादा विद्यार्थी/विद्यार्थिनी आत्महत्येचा विचार करत असले तर तात्काळ जीवनसाथी हेल्पलाईन 18002333330 वर संपर्क करा. किंवा टेलिमानस हेल्पलाईन नंबर 1800914416 वर कॉल करा. आपली आणि विद्यार्थ्याची ओळख पूर्णपण गोपनिय ठेवली जाते. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात येतं.