April Fool जीवावर बेतलं, गळ्यात फास अडकवून मित्राला Video Call केला, आणि त्याचवेळी...

MP News : मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने गळ्यात फास अडकवत मित्रावाल व्हिडिओ कॉल केला, पण हा मस्करी त्याला महागात पडली. एप्रिल फूलच्या नादात तरुणाची जीव गेला.

राजीव कासले | Updated: Apr 2, 2024, 08:27 PM IST
April Fool जीवावर बेतलं, गळ्यात फास अडकवून मित्राला Video Call केला, आणि त्याचवेळी... title=

MP News : एक एप्रिल हा दिवस April Fool म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणीं एकमेकांबरोबर मस्ती, चेष्टा करतात. खरं वाटेल असं काहीतरी कारण सांगून मित्र-मैत्रिणींना फसवलं जातं. पण काहीवेळा मस्करीची कुस्करी होते. अशीच एक घटना समोर आली आहे. मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने आपल्या गळात फास अडकवत मित्राला व्हिडिओ कॉल(Video Call) केला. आपण आपला जीव संपवत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं. 

काय घडलं नेमकं?
मध्य प्रदेशमधल्या इंदोर (MP Indore) इथल्या मल्हारगंज परिसरात ही दुर्देवी घटना घडली. इथं राहाणारा 18 वर्षांचा अभिषेक रघुवंशी हा तरुण दहावी इयत्तेत शिकत होता. एक एप्रिलला स्वत:च्या घरात असताना त्याच्या डोक्यात आपल्या मित्राला एप्रिल फूल बनवण्याचा विचार आला. घरातल्या पंख्याला दोरखंड बांधून त्याने त्याचा फास तयार केला आणि गळ्यात अडकवला. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरुन मित्राला व्हिडिओ कॉल केला. स्टूलवर उभं राहून त्याने मित्राला आपण गळफास घेत असल्याचं सांगितलं. 

मित्राने त्याला असं न करण्यास बजावलं. पण गप्पा गप्पांमध्ये अभिषेकच्या पाया खालचा स्टूल अचानक निसटला आणि अभिषेकला गळफास बसला. जीव वाचवण्यासाठी अभिषेकने प्रयत्न केला. पण यात तो अपयशी ठऱला आणि जीव गमावून बसला. मित्राने तात्काळ पोलिसांनी ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मल्हारगंज पोलीस अभिषेकच्या घरात दाखल झाले. पोलिसांनी याची माहिती अभिषेकच्या कुटुंबियांनाही दिली. अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपाचाराआधीच अभिषेकचा मृत्यू झाला होता. 

पोलिसांनी अभिषेकचा रुम सील केला असून त्याचा मोबाईल फोनही हस्तगत केलाय. खरंच एप्रिल फुल करताना अभिषेकचा मृत्यू झाला की यामागे घातपात आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पत्नी आणि मुलांची हत्या
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह गोणीत भरून ते घारतच ठेवले. दोन दिवासांनी दुर्गंधी पसरल्याने शेजारच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची तपासणी केली असता गोणीत बंद करुन ठेवलेले तीन मृतदेह सापडले. मृतांमध्ये 25 वर्षीय पत्नी ज्योती, 6 वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाच्या मुलाचा समावेश होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस करुन आरोपी राजमिस्त्री राम लखनला अटक केली. 

पोलिसांनाच्या तपासात राम लखनने पत्नीचे अवैध संबंध असल्याने तिची हत्या केल्याची कबूली दिली. लखनऊमधल्या चिनहट परिसरात राहाणाऱ्या एका व्यक्तीबरोबर तीचे अवैध संबंध होते. काही महिने ज्योती त्या व्यक्तीबरोबर राहात होती. त्यानंतर ती पुन्हा मुलांना घेऊन राम लखनकडे आली होती.