Breaking News : फायटर जेट MG-21 क्रॅश, पायलटचा शोध सुरू

पायलट अभिनव यांचा शोधकार्य सुरूच 

Updated: May 21, 2021, 08:02 AM IST
Breaking News : फायटर जेट MG-21 क्रॅश, पायलटचा शोध सुरू title=

मुंबई : पंजाबमधील मोगामध्ये रात्री एक वाजता फायटर जेट मिग 21 क्रॅश झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग सुरू असताना पायलट अभिनवने मिग 21 सोबत झेप घेतली. राजस्थानच्या सूरतगढावर मिग 21 झेप घेत होतं. ज्यानंतर हे विमान क्रश झालं. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट अभिनव जेटमधून बाहेर निघाला होता. त्यांचा शोध घेतला जात आहे.

इंडियन एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,'मोगाच्या कस्बा बाघापुरानाच्या गावातील लंगियाना खुर्द जवळ हे फायटर जेट मिग 21 रात्री उशिरा क्रॅश झालं. घटनास्थळी प्रशासन आणि सेनेचे अधिकारी पोहोचले आहेत. मात्र अजून पायलट अभिनव यांचा शोध सुरू आहे. त्यांच शोधकार्य सुरू आहे.'

एकेकाळी फायटर जेट मिग-21 हे विमान भारतीय वायुसेनेतील प्रमुख मानलं जात आहे. आता याचे चार स्क्वॉड्रन राहिले आहेत. याची कितीही काळजी घेतली असली तरीही किंवा अपग्रेड केलं असलं तरीही हे विमान उडण्यासाठी फिट नाही. बालाकोट एअरस्ट्राइकनंतर मिग-21 बाइसन विमानने पाकिस्तानी लडाखू विमानांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.