Indian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम

भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात.

Updated: Jul 19, 2022, 04:55 PM IST
Indian Army च्या जवानांचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, त्याच्या 'या' कामाला सलाम title=

मुंबई : भारतीय लष्कराचे जवान आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यासाठी सदैव तत्पर असतात. सीमा असो किंवा भारतातील कोणतीही समस्या असो ते देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे येतात. मान्सूनच्या आगमनानंतर अनेक राज्यांतील लोकांना पूर आणि भूस्खलनासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येमुळे हजारो लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत भारतीय सैनिक त्यांच्या मदतीसाठी नक्कीच पुढे येतात.

सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून तुम्हाला अभिमान वाटेल.  असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हासा आश्चर्य वाटेल. ऐवढेच नाही तर हा व्हिडीओ तुमच्या संवेदना उडवतील. सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी भारतीय लष्कराचे जवान आपला जीव धोक्यात घालताना दिसले आहेत.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक रस्ता उतारावर आहे आणि वरून वेगाने पाणी येत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, मुसळधार पाऊस किंवा ढगफुटीनंतर पाणी भरधाव वेगाने रस्त्यावर येत आहे. काही लोक दुकानात अडकले, पण त्यांना वाचवायला कोणीच नव्हतं.

तेव्हाच भारतीय लष्कराचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांना वाचवण्यासाठी मानवी साखळी तयार केली. ज्या परिस्थीतीत लोकांना स्वत:चं रक्षण करणं देखील कठीण जातं अशा स्थीतीत हे जवान दुसऱ्या लोकांचे प्राण वाचवत आहेत.

भारतीय लष्कराच्या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भारतीय जवानांनी मानवी साखळी तयार करून, कसं या दुकानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूपच अभिमानाने वाटेल. हा व्हिडिओ @Soldierathon ने ट्विटरवर शेअर केला आहे आणि तो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'देशासाठी आणि देशवासियांसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याचे धैर्य असलेल्यांना सैनिक म्हणतात. जय हिंद.'

अशा काही प्रतिक्रिया लोकांनी दिल्या

हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 48 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 26 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, 'हे शूर योद्धा! आम्हाला तुझा अभिमान आहे. आम्हाला तुमच्या पालकांचा अभिमान आहे.