भारतीय लष्कराची ताकद वाढणार, तोफखान्यात येणार नव्या तोफा

 ४ तोफा याआधीच भारतात दाखल झाल्या आहेत.

Updated: Nov 9, 2018, 07:16 PM IST
भारतीय लष्कराची ताकद वाढणार, तोफखान्यात येणार नव्या तोफा

नवी दिल्ली : भारतीय लष्करात बोफोर्स नंतर आज प्रथमच नव्या तोफा दाखल होणार आहेत. तोफखाना दलाच्या देवळाली कँम्पमधील प्रशिक्षण केंद्रात आज सकाळी १०च्या सुमारास संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते के-९ वज्र तसंच हलक्या वजनाची एम-७७७ या तोफा समाविष्ट होणार आहे. नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात या तोफा भारतीय तोफखान्यात सहभागी होतील.

४ तोफा आधीच भारतात 

 के ९ वज्र प्रकारच्या १०० आणि एम ७७७ प्रकाराच्या १४५ तोफा भारतीय तोफाखान्यात सामील होणार आहेत. के ९ वज्रची पहिली १० तोफांची बॅच या महिन्यात पुरवली जाईल. त्यानंतर ४० तोफांची बॅच नोव्हेंबर २०१९ मध्ये, तर अखेरच्या ५० तोफा नोव्हेंबर २०२० मध्ये पुरवल्या जाणार आहेत. 

एम ७७७ या प्रकारातल्या ४ तोफा याआधीच भारतात दाखल झाल्या आहेत.

ऑगस्ट २०१९ नंतर पुढील २४ महिने प्रतीमाह ५ तोफा भारताला पुरवल्या जाणार आहेत.

या शिवाय युद्धभूमीवरील कोणत्याही तोफेला खेचून नेण्याची क्षमता असणारे वाहनही आज समाविष्ट करण्यात येणार आहे.