दिग्गज गुंतवणूकदार आरके दमानींनी घटवली या शेअरमधील हिस्सेदारी; 1 वर्षात दिला 110 % रिटर्न

दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा कुरिअर डिलवरी सर्विस प्रोवाइडर कंपनी ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड (Blue Dart Express ltd)च्या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. 

Updated: Oct 17, 2021, 10:56 AM IST
दिग्गज गुंतवणूकदार आरके दमानींनी घटवली या शेअरमधील हिस्सेदारी;  1 वर्षात दिला 110 % रिटर्न

नवी दिल्ली : दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा कुरिअर डिलवरी सर्विस प्रोवाइडर कंपनी ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड (Blue Dart Express ltd)च्या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. खरे तर ही आश्चर्यकारक बाब आहे. कारण गुंतवणूकदारांना या स्टॉकने वर्षभरात दमदार परतावा दिला आहे. दमानी हे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे गुरू मानले जातात. 

दमानी यांनी सप्टेंबरमध्ये 2021 मध्येही हिस्सेदारी कमी केली 
बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध ब्लू डार्ट एक्स्प्रेस सप्टेंबर 2021 च्या तिमाहीमध्ये शेअरहोल्डिंग पॅटर्नच्या मते, राधाकृष्ण दमानी यांनी कंपनीतील होल्डिंग्स 1.68 टक्क्यांनी कमी करून 1.47 टक्के केली आहे. 

दमानी यांनी ब्लू एक्स्प्रेसमध्ये आपली कंपनी ब्राइट स्टार इन्वेस्टमेंट प्रायवेट लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. 14 ऑक्टोबर 2021 ला कंपनीच्या शेअरचा भाव 6525 रुपये होता.

ब्लू डार्ट एक्स्प्रेसमध्ये आरके दमानी यांचा शेअर होल्डिंग पाहिल्यास तो जून 2020 पासून कमी कमी होताना दिसत आहे.