Mukesh Ambani यांनी 24 तासात कमावले 1,90,00,00,00,00,000... बिलेनिअर यादीत स्थान

Reliance Mukesh Ambani Net Worth: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती यांनी फक्त एका दिवसात 19 हजार कोटी रुपयांची कमााई केली आहे. यामुळे आता मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

राजीव कासले | Updated: Jul 5, 2023, 07:38 PM IST
Mukesh Ambani यांनी 24 तासात कमावले 1,90,00,00,00,00,000... बिलेनिअर यादीत स्थान title=

Mukesh Ambani Networth: भारताच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा जगातल्या टॉप-15 श्रीमंताच्या यादीत (Top-15 Billionaires) स्थान मिळवलं आहे. अंबानी यांनी केवळ 24 तासात 19,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे ते ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) यादीत 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत. टॉप 10 मध्ये जागा बनवण्यसाठी त्यांना आता फक्त 3 उद्योगपतींना मागे टाकायचं आहे. यात मुकेश अंबानी यांना जास्त कालावधी लागणार नाही. कारण त्यांच्या पुढे असलेल्या तीन उद्योगपतींच्या आणि मुकेश अंबानी यांच्या कमाईत जास्त अंतर नाही. 

24 तासात 2 अरब डॉलर
गेल्या 24 तासात मुकेश अंबानी यांनी 2 अरब डॉलरहून अधिकची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 90 अरब डॉलरवर पोहोचली आहे. या संपूर्ण वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत मुकेश अंबानी यांनी या वर्षात आतापर्यंत 3.46 अरब डॉलरचा फायदा झाला आहे. 

अंबांनींच्या पुढे 3 जण कोण?
मुकेश अंबानी या यादीत 13 व्या स्थानावर आहेत. त्यांच्याआधी म्हणजे बाराव्या स्थानावर फ्रांसचे फ्रेंनकॉइस बेटनकोर्ट मेइर्स हे आहेत. त्यांची संपत्ती 92.6 अरब डॉलर आहे. 11 व्या स्थानावर मॅक्सिकोचे कार्लोस स्लिम आहेत. त्यांची संपत्ती 97.2 अरब डॉलर इतकी आहे. तर 10 व्या स्थानावर अमेरिकेचे सर्गी ब्रिन हे उद्योगपती आहेत, त्यांची एकूण संपत्ती 104 अरब डॉलर आहे. 

गौतम अदानी कोणत्या स्थानावर 
भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनीही पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत अदानी 21 व्या स्थानावर आहेत. 

पहिल्या स्थानावर कोण
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) कायम आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 247 अरब डॉलर इतकीआहे. गेल्या चोवीस तासात त्यांनी तब्बल 13 अरब डॉलरची कमाई केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेटाचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आहेत. त्यांनी यावर्षात आतापर्यंत 58.6 अरब डॉलरची कमाई केली आहे. 

मुकेश अंबानी यांची भरारी
2016 पर्यंत अंबानी 38 व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान  मिळवलं आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे.